S M L
  • 'आम्हाला कुणीच किंमत देत नाही'

    Published On: Sep 17, 2012 12:22 PM IST | Updated On: Sep 17, 2012 12:22 PM IST

    माधव सावरगावे,औरंगाबाद17 सप्टेंबरआज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन...मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर काही जणांनी जिकीरीनं लढा देऊन स्वातंत्र्याचा काळ डोळयांनी पाहिला..आज या दोन्ही कुटुंबाची फरपट केली जातेय तीही चक्क राज्यसरकारकडून..मराठवाडा मुक्त व्हावा यासाठी दहा वर्ष लढा देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांची आज राज्य सरकारकडून फरपट होतेय. स्वातंत्र्यसैनिकाना जे पेन्शन दिलं जातं त्यासाठी जाचक अटी लादून पेन्शनपासून वंचित ठेवलं जातंय. या जाचक अटीविरोधात गेल्या 14 वर्षापासून लढा सुरु आहे. तरुणपणी मराठवाडा मुक्तीसाठी लढणार्‍या या स्वातंत्र्यसैनिकाना आता म्हातारपणी सरकारविरुध्द लढाव लागतंय.मालक कँपासंग होतं...लेकराबाळं एकीकडं...कुणाची कुणाला दखल नाही..आम्हाला कुणीच किंमत देत नाही... अशी व्यथा रुक्मीणबाई नाना साळुंके यांनी मांडली.मराठवाडा मुक्तीसाठी आपलं हौतात्म्य पत्करणार्‍या उस्मानाबादच्या नाना साळंुके यांच्या 82 वर्षीय पत्नीचा आर्त कुण्या सरकारला कळलीच नाही. देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण मराठवाडा निजामाच्या राजवटीतून काही मुक्त झाला नाही.राज्यसरकारकडून स्वातंत्र्यसैनिकाना जे पेशन दिलं जातं त्यासाठी जाचक अटी लादल्यानं पेशन मिळनही अवघड झालंय.मराठवाडा मुक्ती लढयामध्ये जे स्वातंत्र्यसैनिक सहभागी झाले होते त्यानी त्याकाळातील कागदपत्राच्या नोंदी सादर कराव्यात, शैक्षणिक नोकरीचे प्रमाणपत्र सादर करावेत, त्या काळातील सन्मानपत्र सादर करावेत, पाच पेन्शनधारक स्वातंत्र्यसैनिकाचे शिफारसपत्र सादर करावेत, त्या काळातील कँपप्रमुखाचे पत्र सादर करावे अशा अटी दिल्यानं पेन्शन मिळणं अवघड झालंय. कारण या सर्व नोंदी मिळणच अवघड झालंय. हा 4 जुलै 1995 रोजी जीआर दूर करावा यासाठी गेल्या 14 वर्षांपासून लढा सुरु आहे.सध्या मराठवाडयातील 300 हुन अधिक स्वातंत्र्यसैनिकाची ही अवस्था आहे. ज्यानी स्वातंत्र्य मिळावं म्हणून तरुणपणी लढा दिला आता त्याना आपल्या उतरत्या काळात सरकरशी लढा दयावा लागतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close