S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • विघ्नहर्त्याचा वर्दीतला असाही कार्यकर्ता !
  • विघ्नहर्त्याचा वर्दीतला असाही कार्यकर्ता !

    Published On: Sep 22, 2012 12:11 PM IST | Updated On: Sep 22, 2012 12:11 PM IST

    कपिल भास्कर, नाशिक22 सप्टेंबरअनेक कार्यकर्ते गणेशोत्सवातून घडलेले दिसतात..असाच एक वेगळा कार्यकर्ता म्हणजे नाशिकचे भालचंद्र उर्फ बाळ देशपांडे...वर्षभर वर्दीत वावरणार्‍या या कार्यकर्त्याची गणपती उत्सवातली लगबग वेगळीच असते. नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेचं मैदान वर्षभर शांत असतं, पण गणपती आले की असं घुमायला लागतं..साधारण महिनाभर आधी गुलालवाडी लेझीम पथकाच्या प्रॅक्टीसला सुरुवात होते. आणि प्रॅक्टीसचे रिंग मास्तर असतात.. बाळासाहेब देशपांडे म्हणजेच सगळ्या मुलांचे आप्पा..आप्पांच्या इशार्‍यावर लेझीमचा ठेका धरला जातो.. एरवी भर चौकात गाड्यांचं नियंत्रण करणारी शिट्टी गुलालवाडीच्या मैदानावर लेझीमचा क्लू देते. बंदोबस्तात हाती असणार्‍या काठीऐवजी लेझीमची सळसळ होते. सुरुवातीला व्यायामशाळेचे विद्यार्थी म्हणून लेझीम शिकायला आलेले आप्पा आता स्वत:च गेल्या 34 वर्षांपासून लेझीममास्तर बनले आहे. प्रत्यक्ष मिरवणुकीत आप्पांकडे ड्युटीही हीच असते.बाळ देशपांडे म्हणतात, डिपार्टमेंटनं दिलेली साथ आणि प्रोत्साहन यामुळे मला हे जमलं.जसजसे गणपतीचे दिवस जवळ येतात, प्रॅक्टीसला येणार्‍या मुलांची संख्या वाढत जाते आणि आप्पांचा उत्साहही..टेंभा लेझीम, बैठक, फिरकी, मोर नाच... लेझीमच्या एकेक तर्‍हा...कवायत आणि संगीत याचं अनोखं मिश्रण बाळ देशपांडेंच्या कामातही उतरलंय. म्हणूनच नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत गुलालवाडीच्या लेझीम पथकाची कामगिरी सगळ्यांचंच आकर्षण बनते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close