S M L
  • पंतप्रधानांचा संदेश

    Published On: Sep 21, 2012 05:28 PM IST | Updated On: Sep 21, 2012 05:28 PM IST

    21 सप्टेंबरदरवाढ करणं हा निर्णय कटू होता पण देशाची आर्थिक स्थिती पाहता दरवाढ अपरिहार्य होती. आज देश आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे निर्णय घेणं गरजेचं होतं. डिझेलच्या किंमतीत 17 रुपयांची वाढ अपेक्षित होती. पण सर्वसामान्य लोकांचा विचार करता ती फक्त 5 रुपयांनी वाढ केली. पेट्रोलियम पदार्थांवर मागील वर्षी 1 लाख 40 हजार कोटींची सबसिडी होती जर आम्ही कारवाई केली नसती तर यावर्षी ही दुप्पट झाली असती मग हे रोखणासाठी पैसा कुठून आणणार ? पैसा काही झाडाला तर लागत नाही असा टोलाही विरोधकांना लगावला. तसेच छोटे व्यापारी आणि शेतकरी यांच्या फायद्यासाठी आणि रोजगारनिर्मिती एफडीआय गरजेचं आहे. जी राज्यं एफडीआयला विरोध करतात ती शेतकरी, व्यापार्‍यांच्या हिताचा विचार करत नाहीत असा टोला पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांना लगावला. विरोधक दिशाभूल करतायत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि आर्थिक सुधारणांसाठी आपले हात बळकट करा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close