S M L
  • शरद पवारांनी केली अजितदादांची पाठराखण

    Published On: Sep 24, 2012 12:02 PM IST | Updated On: Sep 24, 2012 12:02 PM IST

    24 सप्टेंबरकृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली. लवकर निर्णय घेतले तर काय चुकलं ? असा सवालही त्यांनी केला.अजित पवारांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 32 जलसिंचन प्रकल्पांच्या सुमारे 20 हजार कोटींच्या कामांना 2009 मध्ये अवघ्या तीन महिन्यांमध्ये घाईघाईत मंजुरी दिली हा. या कामांच्या निविदांना मंजुरी देताना तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार आणि महामंडळाचे कार्यकरी संचालक डी. पी. शिर्के यांनी सह्या केल्या होत्या. या वेळी निविदा जारी करताना प्रत्येक स्तरावरच्या अधिकार्‍यांची सह्या घेण्याची प्रक्रिया पार पाडली गेली नव्हती. त्यामुळे ह्या 32 प्रकल्पांची काम बेकायदेशीरपणे दिल्या गेल्याचा आरोप होतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close