S M L
  • सिंचनावर श्वेतपत्रिका काढा - शरद पवार

    Published On: Sep 28, 2012 02:13 PM IST | Updated On: Sep 28, 2012 02:13 PM IST

    28 सप्टेंबर अजित पवारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या पाठोपाठ ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिले ते शरद पवारांनी फेटाळून लावले आणि कामाला लागा असा आदेश दिला. बैठकीतून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी बातचीत केली. सिंचन प्रकल्प घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय धाडसी होता. राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी असून घोटाळातील सत्य बाहेर यावी अशी आमची इच्छा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतत्रिका काढवी अशी आमची मागणी आहे. अजित पवार आता मंत्रिमंडळातून बाहेर पडले असून ते आता पक्षाबांधणीसाठी काम करणार आहे. इतर मंत्र्यांचे राजीनामे फेटाळले असून त्यांनी उद्यापासूनच आपआपल्या कामाला लागावे असे आदेश देत राजीनामा नाट्यावर शरद पवारांनी पडदा टाकला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close