S M L

गोव्यात पर्यटकांसाठी खास सुरक्षा व्यवस्था

19 डिसेंबर पणजीप्रमोद आचार्यमुंबईनंतरच्या हल्ल्यानंतर आता दहशतवाद्यांच्या रडारवर आहे गोवा. गोव्याला नववर्षाच्या निमित्ताने बहुसंख्य पर्यटक भेट देत असल्यामुळे तिथं सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पण मुंबईमध्ये अनेक इस्त्रायली आणि रशियन नागरिक मारले गेले त्यामुळे रशिया आणि इस्त्रायल सरकारनं त्यांच्या नागरिकांना भारतात जाताना सावध रहावं अशा सूचना दिल्या आहेत. पर्यटन खात्यासाठी भरपूर महसूल मिळवून देणारं गोवा नेहमीच देशी-विदेशी पर्यटकांनी गजबजलेलं असतं.पण यंदा मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यानंतर कितीसे पर्यटक गोव्यात फिरकतील हा प्रश्नच आहे. तसाही मंदीचा फटका पर्यटन व्यवसायाला बसलाच आहे. पर्यटन क्षेत्रासाठी डिसेंबर हा खरंतर सुगीचा महिना पण ऑक्टोबरमध्येच इथल्या पर्यटकांची संख्या 20 टक्क्यांनी रोडावली आणि अजूनही हे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षी रशिया, युके आणि इतर युरोपियन देशांमधून काही प्रमाणात पर्यटक गोव्यात येतील. विमानांचं आरक्षण यंदा 35 टक्क्यांनी कमी झालं आहे तर बुकिंगच होत नसल्यामुळे ब-याच हॉटेल्सनाही रुम्सचे दर कमी करावे लागले आहेत. मुंबईतल्या नरिमन हाऊसवरच्या हल्ल्यामुळे इस्रायली पर्यटकांना त्यांच्या सरकारकडून धोक्याची सूचना मिळाली आहे. त्यामुळे गोव्यात यावर्षी इस्रायली पर्यटक दिसणं दुर्मिळ होणार आहे. रशियानंही ख्रिसमस आणि नववर्षाच्या समारंभांच्या वेळी हल्ले होऊ शकतात अशी त्यांच्या भारतात जाणा-या नागरिकांना सूचना दिली आहे. असं असलं तरी राज्य सरकारनं मात्र पर्यटकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहू असंआश्वासन दिलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत सांगतात, आम्ही गेले वर्षभर गोवा हे अतिरेक्यांचं लक्ष्य असल्याचं ऐकतो आहे. म्हणूनच मी केंद्रीय गृहमंत्र्याना 20 डिसेंबर ते 05 जानेवारी या काळात गोव्यात अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा पुरवावी अशी मागणी केली, ही व्यवस्था कायमची ठेवा असं जर शक्य नसलं तर या काळासाठी द्या तरी अशी मागणी केली. गोव्यात काही किना-यावर बंकर्स निर्माण करण्यात आले आहेत. जिथं विदेशी पर्यटक अनेकदा फिरत असतात. तसंच रात्री सुरू असणा-या मार्केट्समध्ये क्लोजसर्किट कॅमेरे लावण्यासाठी दुकानदारांना सांगण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2008 10:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2008 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close