S M L

कसाबच्या फोटोवरुन विधानपरिषदेत गदारोळ

19 डिसेंबर, नागपूरमुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला पाक अतिरेकी अजमल कसाबचे तुरुंगात असतानाचे फोटो प्रसिद्ध झालेत. त्यावरुन आज विधानपरिषदेत हरकत घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कसाबचे तुरुंगातले फोटो मीडियाकडे कसे पोहोचले, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. अशा पद्धतीनं मीडियाकडे कसाबचे फोटो पोहचणं चौकशीला घातक ठरु शकतात, असं आव्हाड यांनी म्हटलंय.' याबाबत सभापतींनी दखल घेतली आहे. गृहमंत्र्यांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले', असं आव्हाड यांनी सांगितलं. याशिवाय इंटेलिजन्स ब्यूरोकडे असणारी माहिती विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे कशी पोहोचते, यावर विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. विरोधी पक्षाचे नेते सर्रासपणे गुप्तचर खात्याच्या रिपोर्टचा उल्लेख करतात. त्याला आमदारांनी हरकत घेतलीय तर इंटेलिजन्स सक्षम नसल्यामुळेच महत्त्वाच्या बातम्या फुटतात, अशी टीका गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2008 10:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2008 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close