S M L

नागपूरात निधी मिळूनही बालरोग अतिदक्षता विभाग कागदावरच

19 डिसेंबर, नागपूर कल्पना नळसकर नागपूरच्या गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला 72 लाखांचा निधी मिळाला. पण त्यानंतरही बालरोग अतिदक्षता विभाग कागदावरच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा बालरोग अतिदक्षता विभाग राज्यातील पहिलाच ठरणार होता.नागपूरमधील धामना गावच्या दुर्योधन कोल्हेंच्या चार महिन्याच्या मुलाला ' सिकलसेल ' झाला. बाहेर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यानं नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी मुलाला दाखल केलं पण त्याचा मृत्यू झाला. ' डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर जे उपचार करायला पाहिजे होते ते डॉक्टरांनी केले नाही. माझ्यासारखी परिस्थिती दुस-यावर येऊ नये, म्हणून तक्रार केली ', असं त्या मुलाचे वडील दुर्योधन कोल्हे सांगत होते. बाह्यरुग्ण विभागात रोज सुमारे 400 मुलांची नोंदणी होते. पण त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी अतिदक्षता विभागच नाही. ' सिकलसेल ' या आजारानं दुर्योधन कोल्हेंचा मुलगा मरण पावला आणि हीच परिस्थिती दुसर्‍यावर येऊ नये, यासाठी त्यांनी राज्य मानवी आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि या तक्रारीची दखल घेत याच मेडिकल हॉस्पिटलमध्ये दहा बेडचा बालरोग अतिदक्षता विभाग सुरु करण्याचा निर्णय देण्यात आला. पण तो विभाग अजुन सुरू होऊ शकलेला नाही. याबाबत सिकसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेकेंनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली.' यात अशी माहिती समोर आली की, 2 जुलै 2008 मध्ये सरकारने या विभागासाठी लागणारी सर्व सामुग्री खरेदी करण्यासाठी 62 लाख रुपये दिलेत ', असं संपत रामटेके यांनी सांगितलं. एवढं असुनहीअसा काही निधी मेडिकलं हॉस्पिटल दिल्याचं अधिकारी मान्य करत नाही. ' राज्य मानवी आयोगानं बालरोग अतिदक्षता विभाग सुरू करण्यास सांगितले पण तसा काही निधीच उपलब्ध न झाल्याने आम्ही पीडब्लुडीला काही निर्देश देऊ शकत नाही. त्यामुळे अजुन कामाला सुरुवात झाली नाही ', असं मेडिकल अधिष्ठाता दीप्ती डोणगांवकर यांनी सांगितलं. सुमारे 72 लाखांचा निधी मेडिकलच्या तिजोरीत पडून आहे. पण हा विभाग सुरु होण्याची चिन्ह दिसत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2008 12:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2008 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close