S M L
  • गॅस भरत असताना 2 गाड्या जळून खाक

    Published On: Nov 3, 2012 12:31 PM IST | Updated On: Nov 3, 2012 12:31 PM IST

    03 नोव्हेंबरसगळीकडे गॅस सिलिंडरचा मुद्दा गाजत असताना कोल्हापुरात मात्र एका वाहनातून दुसर्‍या वाहनात गॅस भरला जात असताना 2 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. मारुती ओमनी आणि कायटेनिक स्कूटी या गाड्या जळाल्या आहेत. शहरातील सीपीआर हॉस्पिटलच्या चौकामध्ये ही घटना घडली. मारुती ओमनीच्या सिलिंडरमधून कायनेटीक स्कूटीमधल्या छोट्या सिलिंडरमध्ये हा गॅस भरला जात होता. त्यावेळी दोन्ही वाहनांनी अचानकपणे पेट घेतला आणि दोन्ही वाहनं जळून खाक झाली. आग लागल्यानंतर दोन्ही वाहनांचे मालक चालक फरार झालेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतर ही आग आटोक्यात आणली गेली. घरांमध्ये सिलिंडरची वानवा असताना वाहनांमध्ये अशा प्रकारे बेकायदेशीरपणे सिंलिडरचा वापर होत असल्यानं प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close