S M L
  • इरॉम शर्मिलाच्या उपोषणाला 12 वर्ष

    Published On: Nov 5, 2012 05:19 PM IST | Updated On: Nov 5, 2012 05:19 PM IST

    05 नोव्हेंबरईशान्येकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या लष्कर विशेषाधिकार कायद्याविरोधात इरॉम शर्मिलानं आंदोलन छेडलं. या जाचक कायद्याविरोधात तिनं सुरू केलेल्या उपोषणाला यावर्षी 12 वर्षं पूर्ण होत आहे. पण या 12 वर्षांत परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. इरॉम शर्मिला गेल्या 12 वर्षांपासून उपोषण करतेय. सैन्याला असलेला विशेषाधिकार कायदा रद्द व्हावा, अशी तिची मागणी आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतोय. पण लष्कराच्या विशेषाधिकार कायद्याचा मुद्दा हा भ्रष्टाचारासारखा सर्वव्यापी नाही. म्हणूनच दिल्लीसाठी तो दुर्लक्षित राहिला आहे. 2 नोव्हेंबर 2000 मध्ये घुसखोरांनी लष्कराच्या छावणीवर बॉम्बहल्ला केला. हा हल्ला परतवून लावताना आसाम रायफल्सच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात 10 नागरिकांचा मृत्यू झाला. या दहा जणांमध्ये राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता 18 वर्षांचा सिनाम चंद्रामणीही होता आणि याच दिवशी शर्मिलानं आपलं ऐतिहासिक उपोषण सुरू केलं ते आजतागायत सुरू आहे. मणिपूर सरकारनं शर्मिलावर आत्महत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक झाली. लष्कराविरोधातला हा संताप सरकारच्या उदासीनतेविरोधातही आहे. सरकारने डिस्टर्ब्ड एरिया ऍक्ट लागू केल्यामुळे लष्कराची उपस्थिती सक्तीची आहे. मानवी हक्क पायमल्ली होणाच्या घटना कमी झाल्या असल्या.. तरी मणिपूरचा हिंसेविरुद्धचा संघर्ष अजूनही सुरूच आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close