S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा -राऊत
  • बाळासाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा -राऊत

    Published On: Nov 16, 2012 12:41 PM IST | Updated On: Nov 16, 2012 12:41 PM IST

    16 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत कालच्यापेक्षा आज चांगली सुधारणा झाली आहे. उपचाराला ते चांगला प्रतिसाद देत आहे. हेचर्यकारक आहे. डॉक्टरसुद्धा चकीत आहे. त्यांचे हार्टबिट,पल्स रेट आणि ब्लडप्रेशर नार्मल आहे. अशी दिलासादायक माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. बुधवारी रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. मात्र आपल्या लाडक्या महानेत्याच्या प्रकृतीची काळजी सर्व शिवसैनिकांना लागली आहे. देशभरात ठिकठिकाणी बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी होमहवन,प्रार्थना केल्या जात आहे. अनेक ांनी देव पाण्यात ठेवले आहे. दोनदिवसांपासून हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ठाण मांडलं आहे. आज संध्याकाळी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होतं आहे. देशभरात शिवसैनिक,चाहते प्रार्थना करत आहे. बाळासाहेब नेहमी सांगतात शिवसेनेचा कडवटपणा, शिवसैनिकांचं प्रेम हेच माझं टॉनिक आहे. याचप्रेमामुळे लवकरच असा दिवस येईल की, बाळासाहेब स्वत: येऊन सर्वांना दर्शन देतील. बाळासाहेब लवकरच बरे होतील याबद्दल आम्हाला खात्री आहे असंही राऊत यांनी सांगितलं. तसंच गेल्या चार वर्षापासून जे डॉक्टर बाळासाहेबांच्या तपासणी करतात त्यांची टीम उपचार करत आहे. बाळासाहेब उपचारांना,औषधांना चांगला प्रतिसाद देत आहे. हे आश्चर्यकारक आहे. डॉक्टरसुद्धा चकीत झाले आहे. बाळासाहेब आमच्यासाठी ईश्वर आहे. आज देशभरात शिवसैनिक प्रार्थना,पुजा,होमहवन करत आहे. यात खूप मोठी शक्ती आहे ही शक्ती साहेबांच्या पाठीशी आहे ते लवकरच बरे होतील अशा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close