S M L
  • 'आम्ही चुकलो पण अटक अयोग्य'

    Published On: Nov 20, 2012 12:02 PM IST | Updated On: Nov 20, 2012 12:02 PM IST

    20 नोव्हेंबरआमचं चुकलं पण आम्हाला अटक करायला नको होतं. मी कमेंट टाकल्यानंतर काही जणांनी विरोध केला. त्यानंतर मी लगेच माफीसुद्धा मागितली. पण कोणीतरी माझे अकाऊंट हॅक केलं. नंतर कसं तरी माझं अकाऊंट सुरु झालं आणि मी ते डिऍक्टिव्हेट केलं. आणि परत कोणी तरी माझ्या नावाने फेक अकाऊंट बनवलं आहे. पोलिसांना मला खूप सहकार्य केलं. यापुढे मी फेसबुक वापरणार नाही अशी ग्वाही फेसबुकवर कमेंट टाकणार्‍या तरुणीने दिली. तसेच उद्या कायदेशीर कोणतीही कारवाई झाली तर मी त्याला तयार राहिलं असंही या तरुणीनं म्हटलं आहे. त्याचबरोबर या तरूणींच्या मैत्रीणीने कमेंटला लाईक केलं होतं त्यामुळे तिलाही अटक करण्यात आली होती. आम्हाला अटक करायला नको हवं होतं. आम्हाला कोणत्याच पक्षाच्या लोकांनी आम्हाला समज दिला नाही. मी आता माझं फेसबुक अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं आहे. पण मी घाबरलेली नाही मी लवकरच पुन्हा माझं फेसबुक अकाऊंट सुरु करणे. पण कोणतीही कमेंट अथवा लाईक करताना विचार करेन अशी कबुली या तरुणीने दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close