S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गुपचूप फाशी दिल्याचा आरोप चुकीचा -उज्ज्वल निकम
  • गुपचूप फाशी दिल्याचा आरोप चुकीचा -उज्ज्वल निकम

    Published On: Nov 21, 2012 12:14 PM IST | Updated On: Nov 21, 2012 12:14 PM IST

    21 नोव्हेंबरभारतात दहशतवाद्याविरोधात कठोर कारवाई केली जाते असा संदेश आता अतिरेकी संघटनेना दिला गेला आहे. कसाबच्या फाशीच्या अंमलबजावणीमुळे मला दिलासा मिळाला आहे. 26/11 च्या हल्ल्यात 166 लोकांना प्राण गमवावे लागले आणि 238 जण जखमी झाले त्यांना न्याय मिळाल्याची भावना माझ्या मनात आहे. कसाबला गुपचुप फाशी दिली हा आरोप चुकीचा आहे. आपल देश हा लोकशाहीचा देश आहे. इथं भरचौकात कोणाला फाशी दिली जात नाही. न्यायालयीन प्रक्रियाद्वारेच कसाबला फाशी देण्यात आली आहे. यात चुपीचा काही संबंध नाही. कसाबला फाशी ही एका दहशतवादी प्रवृत्तीचा हा नायनाट आहे अशी प्रतिक्रिया सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close