S M L
  • असं घडलं 'ऑपरेशन X'

    Published On: Nov 21, 2012 04:53 PM IST | Updated On: Nov 21, 2012 04:53 PM IST

    21 नोव्हेंबरमुंबईवर हल्ला करणारा अतिरेकी अजमल कसाबला आज फाशी देण्यात आली. कसाबला फाशी देण्याआधीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण त्याबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. यासाठी एक टीम बनवण्यात आली होती. आणि त्यांच्या कामाला ऑपरेशन X असं देण्यात आलं. काय होतं हे ऑपरेशन X.. हे सांगणारा हा विशेष रिपोर्ट.. 26 नोव्हेंबर 2008..10 सशस्त्र अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला चढवला आणि तीन दिवसांत दक्षिण मुंबईत हैदोस घालत 164 जणांचे जीव घेतले आणि 308 जणांना जखमी केलं. या हल्ल्यात एक अभूतपूर्व घटना घडली. तुकाराम ओंबळे नावाच्या पोलीस फौजदारांनी. अजमल कसाब नावाचा 21 वर्षांचा पाकिस्तानी अतिरेक्याला जिवंत पकडलं. साडे तीन वर्ष केस चालल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर 5 नोव्हेंबर 2012 - राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला7 नोव्हेंबर 2012 - केंद्रीय गृहमंत्र्यांनी फाशीच्या आदेशावर सही केली8 नोव्हेंबर 2012 - कसाबला फाशी देण्याचे राज्य सरकारला आदेश21 नोव्हेंबर 2012 - सकाळी 7:30 वाजता फाशी देण्याची वेळ ठरलीकसाबला फाशीची शिक्षा देण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली. या ऑपरेशनला कमालीचं गोपनीय ठेवण्यासाठी 10 अधिकार्‍यांची टीम तयार करण्यात आली. ऑपरेशन 'X'- नेतृत्व डी. जी. संजीव दयाळ यांच्याकडे- समन्वयाची जबाबदारी आय. जी. देवेन भारतींवर- कसाबच्या सुरक्षेची जबाबदारी हिमांशू राय यांच्याकडे- सदानंद दाते यांच्याकडे एकूण सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी- राकेश मारिया, रमेश महाले, बिपिन बिहारी, मीरा बोरवणकर यांच्या महत्त्वाच्या भूमिकाठरल्यानुसार सोमवारी रात्री कसाबला मुंबईहून पुण्यातल्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं. बुधवारी पहाटे त्याला अखेरची इच्छा विचारण्यात आली. पण त्याने कोणतीही इच्छा नसल्याचं सांगितलं. फासावर नेताना त्याला पश्चाताप होत होता असं तुरुंग अधिकार्‍यांना सांगितलं. ऐसी गलती गवारा नहीं होगी.. अल्लाह मुझे माफ करें. असं त्याने फासावर चढण्याआधी म्हटलं. सकाळी 7.30 वाजता त्याला फासावर टांगण्यात आलं. 21 नोव्हेंबर हा फाशीचा दिवस निश्चित करण्यात आल्याचं कसाबला 12 नोव्हेंबरलाच सांगण्यात आलं होतं. कसाबच्या इच्छेनुसार ही माहिती कराचीतल्या त्याच्या आईला कळवण्यात आली होती. पण त्याचं शव स्वीकारण्याची तयारी पाकिस्तानने दाखवली नाही. म्हणून येरवडा तुरुंगातच त्याला दफनही करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close