S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • फाशी देणं ही काही सार्वजनिक गोष्ट नाही -मुख्यमंत्री
  • फाशी देणं ही काही सार्वजनिक गोष्ट नाही -मुख्यमंत्री

    Published On: Nov 21, 2012 06:26 PM IST | Updated On: Nov 21, 2012 06:26 PM IST

    21 नोव्हेंबरराष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज आठ तारखेला फेटाळला. त्यानंतर न्यायधीशांनी फाशीचं ठिकाण,वेळ, तारीख ठरवली. 13 तारखेला मी त्या फाईलीवर सही केली. याबद्दल गोपनीयता बाळगण्याची गरज होती. 21 तारखेपर्यंत याची पुर्ण तयारी करण्यात आली. ही माहिती जर लिंक झाली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. एखाद्यावेळेस अतिरेक्यांनी हल्ला केला असता ही शक्यताही नाकारता येत नाही. फाशी देणं ही काही सार्वजनिक गोष्ट नाही. भारत हा लोकशाहीचा देश आहे. कसाबची फाशी पुर्ण न्यायालयीन प्रक्रियाद्वारे करण्यात आली. फाशी देणं हा काही रोजचा कारभार नाही. 1995 नंतर राज्यात ही पहिली फाशी देण्यात आली. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं होतं. पुर्ण न्यायालयीन चौकटीत ही फाशी पार पडली याबद्दल सर्वांनी गोपनीयता बाळगली यासाठी अधिकार्‍यांचं कौतुक करण्यासारख आहे. मी स्वत: यात जातीनं लक्ष घातलं. उद्या असं कोणी म्हणून नये फाशीसाठी भारताने शॉर्टकट स्विकारला. म्हणून गोपनीयता बाळगण्यात शहाणपणा होता असं स्पष्ट मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close