S M L
  • 26/11 ते 26/11

    Published On: Nov 26, 2012 03:28 PM IST | Updated On: Nov 26, 2012 03:28 PM IST

    26 नोव्हेंबरमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 4 वर्षं पूर्ण होत आहे. आज मुंबईसह देशभरात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर 2008..10 सशस्त्र अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला चढवला आणि तीन दिवसांत दक्षिण मुंबईत हैदोस घालत 164 जणांचे जीव घेतले आणि 308 जणांना जखमी केलं. या हल्ल्यात एक अभूतपूर्व घटना घडली. तुकाराम ओंबळे नावाच्या पोलीस फौजदारांनी. अजमल कसाब नावाचा 21 वर्षांचा पाकिस्तानी अतिरेक्याला जिवंत पकडलं. 21 नोव्हेंबरला कसाबला फासावर लटकावण्यात आलं. पण 26 नोव्हेंबर ही तारीख भारतीय इतिहास काळ्याशब्दांनी लिहली गेली. या तारखेत वेदना आहे, जखमा आहे, शुर वीरांचे बलिदान आहे....चार वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला आहे का ? त्यांच्या ओला जखमा भरून निघाल्या आहे का ? चार वर्षानंतर त्या मुंबईकरांच्या मनातली भीती कमी झाली का ? दुख कमी झालं का ? घरातली परिस्थिती बदली आहे का ? चार वर्षानंतर त्यांची भावना काय आहे....26/11 ते 26/11....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close