S M L
  • देशभरात ख्रिसमसची धूम

    Published On: Dec 25, 2012 12:03 PM IST | Updated On: Dec 25, 2012 12:03 PM IST

    25 डिसेंबरदेशभरात आज ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होताय. देशातल्या प्रत्येक शहरात काल मध्यरात्री ख्रिसमस मास झाले. त्यानंतर करल्स गायली गेली. काल रात्रीपासून ख्रिसमसची ही धूम सुरु झाली आणि आज संपूर्ण दिवसभर सगळीकडे आपल्याला हाच उत्साह बघायला मिळतोय. येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला होता. त्यामुळे ख्रिसमसच्या दिवशी खास गोठा बांधला जातो. या गोठ्यात येशूंच्या जन्मसोहळ्याचा देखावा सजवला जातो. वसईमध्ये सामाजिक एकात्मतेचा संदेश देत हिंदू बांधवांनीही असाच एक गोठा बांधलाय. तर दुसरीकडे ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यातलाच एक म्हणजे इन्डेल... ही खास पारंपरिक चिकन डिश आहे. वसई आणि विरारमधल्या घरांमध्ये खास हा पदार्थ बनवला जातो.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close