S M L
  • राजकीय घडामोडी -2012

    Published On: Dec 26, 2012 11:13 AM IST | Updated On: Dec 26, 2012 11:13 AM IST

    2012....राजकारणात वादळ निर्माण करणारं...राजकीय पक्षांना धक्का देणारं.....प्रस्थापित राजकारणात आशेचं किरण दाखवणारं वर्ष....या वर्षात राजकीय पक्षांना अंतर्गत वादळांचा आणि जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला...या वर्षाची सुरवात झाली ती उत्तरप्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पडघमांनी....आणि हे वर्ष संपलं ते गुजरात मधल्या नरेंद्र मोदींच्या विजयी हॅटट्रिकनं....फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उत्तरप्रदेशात निवडणुका झाल्या आणि राज्यात समाजवादी पार्टीची निर्विवाद सत्ता आली....नेतृत्व गेलं नव्या पिढीकडे..मुख्यमंत्री झाले अखिलेश यादव...काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी सर्व जोर लावूनही काँग्रेसला या राज्यात आपली लाजही राखता आली नाही...तर गुजरातमध्ये...नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्‍यांदा राज्यात एकहाती सत्ता आणली आणि गुजरातवर आपली पकड कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close