S M L

विदर्भ पॅकेज घोटाळा : गायी पोहचल्या नातेवाईकांकडे

20 डिसेंबर, नागपूरप्रशांत कोरटकर विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी पंतप्रधानांनी पॅकेज जाहीर केलं होतं. त्याअंतर्गत गरीब शेतकर्‍यांना जोडधंद्यासाठी गायींचं वाटपही करण्यात आलं होतं. पण या गायी राजकारण्यांच्या नातेवाईकांनीच लाटल्याचं उघड झालं आहे. गाईसाठी लागणार्‍या पोषण आहाराचा निधीही याच नातेवाईकांनी लाटला आहे. त्यात काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा अध्यक्ष वामन कासावार, पणन-महासंघाचे संचालक सुरेश लोणकर, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामजी आडे, दिग्रसचे आमदार संजय देशमुख यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. पण, चालू हिवाळी अधिवेशनात सरकार या मुद्द्याला बगल देत आहे. यवतमाळ जिल्ह्यात पॅकेजच्या आधी 615 गायींचं वाटप झालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री पॅकेजमधून 2 हजार 397 गायी, तर पंतप्रधान पॅकेजमधून 2 हजार 396 गायींचं वाटप करण्यात आलं होतं. एकूण 5 हजार 408 गायींचं वाटप सरकारी अधिकार्‍यांनी दाखवलं. त्यात बरेच लाभधारक नेत्यांचे नातेवाई किंवा सगेसोबतीच आहेत. पंतप्रधान पॅकेजअंतर्गत सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाटलेल्या गायी अनेक काँग्रेस नेत्यांच्याच दारी गेल्याचं उघड झालंय. यासंबधी चर्चा होऊनही राज्य सरकारनं काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे विरोधकांनी आता याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.गायींच्या खाद्यासाठी दिलेली रक्कमही याच लोकांनी लाटलीय. "या पॅकेजमधून वाटप झालेल्या गाईला कालवड झालं, तर तिला पोषक आहारासाठी 1800 रुपये देण्याचीही योजना होती. मात्र आता गोर्‍हा झाला, तरी कागदोपत्री गोर्‍हा दाखवून या लोकांनी पैसे लाटले" असा आरोप केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी केली. काँग्रेस नेत्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. गायी वाटपापूर्वी जिल्ह्यात 4 हजार 223 लिटर दूधाचं संकलन होत होतं. गायी वाटपानंतर मात्र दूध संकलन वाढण्याऐवजी कमी होऊन 3 हजार 277 लिटरवर आलंय. वाटप झालेल्या गायींचं दूध गेलं कुठे ? हा ही प्रश्नच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2008 09:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2008 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close