S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव अयोग्य -पुष्पा भावे
  • व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव अयोग्य -पुष्पा भावे

    Published On: Jan 5, 2013 12:02 PM IST | Updated On: Jan 5, 2013 12:02 PM IST

    05 जानेवारीचिपळूणमध्ये होणार 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दल आणखी एक वाद उफाळून आलाय. संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय. पण बाळासाहेबांच्या नावाला अनेक साहित्यिकांनी आक्षेप घेतलाय. साहित्यिकांना 'बैल' असं संबोधणार्‍या बाळासाहेबांचं नाव देण्याला आक्षेप घेण्यात येतोय. बाळासाहेबांनी त्यावेळी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.लं देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून 'झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला', 'मोडका पुलं' आणि साहित्य संमेलनाला 'बैलबाजार' अशी ठाकरी टीका केली होती. आता ज्या बाळासाहेबांनी साहित्यांना अशा उपाध्या दिल्यात त्याचं नाव व्यासपीठाला का द्यावं ? असा सवाल साहित्यकांनी उपस्थित केला. याबाबत जेष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांच्याशी संपर्क साधला असता. बाळासाहेब ठाकरे हे मोठे होते. पण त्यांचं निधन झालं म्हणून त्यांचं नाव देणं योग्य नाही पुढचा मागचा विचार करणे गरजेच आहे कारण त्यांनी साहित्याकांविषयी कधी सदभावना दाखवला नाही अशी प्रतिक्रिया पुष्पा भावे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close