S M L
  • महात्मा गांधींच्या वस्तू परदेशातून भारतात

    Published On: Jan 8, 2013 04:15 PM IST | Updated On: Jan 8, 2013 04:15 PM IST

    08 जानेवारीमहात्मा गांधींच्या वैयक्तिक वापरातल्या वस्तू आज भारतात आणण्यात आल्या. मुंबई विमानतळावर या वस्तू स्वीकारण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग, मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरूष राजेंद्र सिंग विमानतळावर हजर होते. महात्मा गांधींनी वापरलेल्या वस्तू, त्यांची पत्रं, त्यांची स्वाक्षरी असलेली पुस्तकं आणि इतर काही कागदपत्र आज भारतात दाखल झाले. आता या सर्व वस्तूंचं प्रदर्शन देशभर भरवलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून गांधींचे विचार नव्या पिढीला सांगितले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close