S M L
  • 'वादग्रस्त' ओवेसी बंधू !

    Published On: Jan 8, 2013 05:26 PM IST | Updated On: Jan 8, 2013 05:26 PM IST

    08 जानेवारी1956 साली हैदराबादमध्ये एमआयएमची स्थापना झाली. अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचा भाऊ असादुद्दीन ओवेसी यांचा जुन्या हैदराबादमध्ये मोठा दबदबा आहे. नेहमी वाद निर्माण करण्यात या दोघा भावांचा हातखंडा आहे. आंध्रप्रदेशात त्यांचा एमआयएम हा पक्ष लहान असला तरी, त्याचा प्रभाव मात्र मोठा आहे. ओवेसी बंधूंची जुन्या हैदबादमध्ये सत्ता चालते. इथल्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल दहशत आहे. आणि त्यांना विरोध करण्याची हिंमतही कोणी दाखवत नाही. त्यांचा पक्ष मजलिस-ए इत्तहदुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचा हैदराबादमध्ये दबदबा आहे. काही वेळा शहराच्या बाहेरही याची दखल घेतली जाते.मोठा भाऊ असादुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधून खासदार आहेत. तर लहान भाऊ अकबरुद्दीन ओवेसी आमदार आहेत. हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. पण स्थानिक घाणेरडं राजकरण करण्यात माहीर आहेत. चुकीच्या कारणांसाठीच नेहमी त्यांची चर्चा होते. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाला होता.ओवेसी घराण्याचं प्रभाव असलेल्या एमआयएमचा फक्त एक खासदार आणि 7 आमदार आहेत. पण त्यांची खरी ताकद जितकी आहे, त्या तुलनेत त्यांची आंध्रप्रदेशातल्या मुस्लीम समाजावर मात्र पकड तितकीशी पकड नाही. ताकदीचा जोरावर ते नेहमी सरकारला त्यांच्या कृत्यांकडे डोळेझाक करायला भाग पाडतात.अकबरुद्दीन ओवेसी यांची यापूर्वीची वादग्रस्त वक्तव्यं बघूयात...2007 - सलमान रश्दींना जीवे मारण्याचा फतवा 2007 - बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना जीवे मारण्याचा फतवा2012 - प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गेल्या डिसेंबर महिन्यात एफआयआर दाखलप्रक्षोभक भाषणविरोधी कायदे1) कलम 153 - प्रक्षोभक भाषण करून दंगली भडकवणे- वॉरंटशिवाय पोलीस थेट अटक करू शकतात- अजामीनपात्र गुन्हा- 3 वर्षांची शिक्षा किंवा जेल किंवा दोन्हीही - जर असं भाषण धार्मिक स्थळावरून केलं असल्यास 5 वर्षांची शिक्षा2) कलम 153 A - प्रक्षोभक भाषण करून दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे- वॉरंटशिवाय पोलीस थेट अटक करू शकतात- अजामीनपात्र गुन्हा- 3 वर्षांची शिक्षा किंवा जेल किंवा दोन्हीही 3) कलम 153 B - प्रक्षोभक भाषण करून देशाची एकता धोक्यात आणणे- वॉरंटशिवाय पोलीस थेट अटक करू शकतात- अजामीनपात्र गुन्हा- 3 वर्षांची शिक्षा किंवा जेल किंवा दोन्हीही

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close