S M L
  • बांग्लादेशींना 'आधार' भारतीय 'निराधार'

    Published On: Jan 21, 2013 01:51 PM IST | Updated On: Jan 21, 2013 01:51 PM IST

    सुधाकर काश्यप, मुंबई 21 जानेवारीआधार कार्ड योजना मोठ्या गाजावाजा करत सुरू करण्यात आली. आधार कार्ड मिळावं म्हणून नागरिक सर्व प्रकारे प्रयत्न करतायत. पण आजही लाखो नागरिकांना आधार कार्ड मिळालेलं नाही. तर दुसरीकडे बांग्लादेशीय नागरिकांना सहजपणे आधार कार्ड मिळत असल्याचं पोलीस कारवाईत उघडकीस आलंय. आधार कार्ड मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. पण यानंतरही आधारकार्ड मिळेलच याची त्यांना शाश्वती नाही. पण दुसरीकड अनधिकृतपणे आलेल्या बांग्लादेशी नागरिकांना मात्र सहजपणे आधारकार्ड मिळत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मुळचा बांग्लादेशीय असलेल्या मोहम्मद अस्लम यानं भारतीय असल्याची अनेक कागदपत्र गोळा केली. सुरुवातीला त्यानं पश्चिम बंगालमधल्या पेपूल बंदा या गावचा रहिवाशी असल्याचा दाखला घेतला. त्यानंतर मतदान ओळखपत्र मिळवलं. त्यावरुन ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याद्वारे आधार कार्ड मिळवलंय. मोहम्मद अस्लम याने जेव्हा ड्राइव्हिंग लायसन्स काढलं त्यावेळी त्याच्या कडे जन्म दाखला, रेशन कार्ड नव्हतं. यानंतर ही त्याला ड्राइव्हिंग लायसन्स देण्यात आलं.त्या आधारावरंच त्याने नंतर पॅन कार्ड आणि अनेक बँकांत खाती उघडली. या धक्कादायक प्रकारानंतर सामान्यांना आधार देणार्‍या या योजनेच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेशी खेळ तर केला जात नाहीयेना याचीही दखल पोलीस आणि सरकारनं घेण्याची गरज आहे. आधार कार्ड म्हणजे सामान्य माणसांचा अधिकार असं घोषं वाक्य म्हटलं आहे. पण सामान्य माणसांना ते मळत नाही आणि बांग्लादेशींना ते कसं सहजपणे मिळतं असा सामान्य माणसांचा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close