S M L
  • शेतकर्‍यांकडून होणार 112 कोटींची वसुली

    Published On: Jan 21, 2013 01:38 PM IST | Updated On: Jan 21, 2013 01:38 PM IST

    संदीप राजगोळकर, कोल्हापूर21 जानेवारी2008 सालच्या कर्जमाफीतली कोल्हापूर जिल्ह्यातली 112 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिल्यानं जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 2008 साली केंद्र सरकारच्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांना कर्जमर्यादेपेक्षा जादा रक्कम अदा करण्यात आली. बोगस कर्ज दाखवून रक्कम वाटण्यात आली. त्यावर कॅगनं आक्षेप घेतला. आता ही रक्कम एक महिन्याच्या आत वसूल करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेनं दिलेत. तब्बल 45 हजार शेतकर्‍यांकडून आता ही रक्कम वसूल केली जाणार आहे. ही रक्कम वसूल करुन सरकार शेतकर्‍यांचंच नुकसान करतंय असा आरोप किसान संघटनेनं केलाय. तर ही वसूली बेकादेशीर आहे, असा आरोपही केलाय. बोगस कर्ज वाटप झालं असेल तर त्याची वसुली योग्यच असल्याचं खासदार सदाशिव मंडलिक यांनी म्हटलंय. तर याबाबत नाबार्डनं एका समितीची नियुक्ती केली त्याचा निर्णय अजून अपेक्षित आहे असं सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्यानं त्याबाबतचा संभ्रम अधिक वाढलाय.या वसुलीमुळं शेतकर्‍यांना येत्या रब्बी हंगामासाठीचं कर्ज मिळणार नाही असं दिसतंय. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close