S M L

मराठी कलाकारांनी बनवला राष्ट्रगीताचा अल्बम्

20 डिसेंबर, मुंबई रचना सकपाळअंधेरीच्या सिनेमॅक्समध्ये मराठी कलाकारांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचं लाँचिंग करण्यात आलं. 'गाये तव जय गाथा' या नावाने त्याचं लाँचिंग करण्यात आलं. तब्बल 75 मराठी कलाकारांनी एकत्र येऊन हा अल्बम बनवला आहे. मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये मराठी सिनेमे गर्दी करतायत. बॉक्स ऑफिसवर यशही मिळवत आहेत. आणि अशा वेळीच एक अभिमानास्पद गोष्ट घडलीय. ती म्हणजे 75 मराठी कलाकारांनी म्हटलेलं राष्ट्रगीत. कुठलाही सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत दाखवलं जातं आणि त्यासाठीच पुष्कर श्रोत्रीने या कलाकारांकडून राष्ट्रगीत गाऊन घेतलं आहे. मराठी कलाकारांच्या आवाजात राष्ट्रगीत गाण्याची कल्पना पुष्कर श्रोत्रीची आहे. " ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या सर्व क्रांतिकारी, शहीद, स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे आणि आता 26 / 11 च्या मुंबई स्फोटात शहीद झालेले पोलीस यांना सन्मान राखण्यासाठी प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये हे प्रत्येक सिनेमाच्या सुरुवातीला हे राष्ट्रगीत लावलं जावं, " अशी भावना अभिनेता पुष्कर श्रोत्री यानं व्यक्त केलं. प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना तेवत ठेवणारं राष्ट्रगीत गातानाच्या प्रत्येक कलाकाराच्या मनात काही वेगळ्याआठवणी आहेत. " मराठी कलाकारांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत गाणं ही कल्पनाच संस्मरणीय आहे.राष्ट्रगीत गाताना अभिमान वाटला, असं मत अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. " पुष्करने हे राष्ट्रगीत पडद्यावर आणलंय त्यासाठी त्याला मी 100 पैकी 100 गुण देतो, असं अभिनेता विनय आपटे म्हणाले. भारतीय गायन वादनाच्या कायद्याला अनुसरूनच या राष्ट्रगीताचं शुटींग करण्यात आलं आहे. तब्बल 6 महिन्यांच्या अधक परिश्रमानंतर मुंबईच्या प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये हे राष्ट्रगीत प्रत्येक सिनेमा सुरू होताना दाखवलं जाणार आहे. राष्ट्रगीताच्या शुटींगचा अनुभवही वेगळाच होता. " राष्ट्रगीताचं शुटींग करताना आमची छाती गर्वानं फुलून आली. स्वत:चा अभिमान वाटायला लागला, " असं अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाली. राष्ट्रगीताच्या निमित्तानं मराठीतले 75 कलाकार एकाच मंचावर आलेत. मराठीतला असा हा पहिलाच प्रयोग म्हणता येईल...

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2008 04:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2008 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close