S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ओबीसी-दलितांमुळे भ्रष्टाचार वाढला -आशिष नंदी
  • ओबीसी-दलितांमुळे भ्रष्टाचार वाढला -आशिष नंदी

    Published On: Jan 26, 2013 11:50 AM IST | Updated On: Jan 26, 2013 11:50 AM IST

    26 जानेवारीआज देशभरात मोठ्या उत्साहात भारताचा 64 वा प्रजासत्ताक दिन साजरा होतं आहे पण जयपूरमध्ये साहित्य उत्सवात 'प्रजा'सत्ताक शब्दाचीच थट्टा करण्याची शर्मेची घटना घडलीय. देशात ओबीसी आणि दलितांमुळेच भ्रष्टाचार वाढल्याचं खळबळजनक व्यक्तव्य प्रसिध्द लेखक आशिष नंदी यांनी केलं आहे. नंदी यांच्या या वक्तव्यावर देशभरातून आक्षेप घेण्यात येतोय. नंदी यांची टीका आक्षेपार्ह असून त्यांना संमेलनाच्या बाहेर काढावं अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. राज्यातील अनेक मागसवर्गीय संघटनांनी नंदी यांच्या विधानावर तीव्र नाराज व्यक्त केला आहे. नंदी यांच्या विधानामुळे संमेलन आयोजकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. संमेलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. आपल्या विधानामुळे तीव्र पडसाद उमटत आहे असं लक्ष्यात आल्यावर नंदींनी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे असं स्पष्टीकरण नंदी यांनी दिलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close