S M L
  • 'शांततेसाठी प्राण देण्याचीही तयारी'

    Published On: Feb 5, 2013 12:11 PM IST | Updated On: Feb 5, 2013 12:11 PM IST

    05 फेब्रुवारीमी प्रार्थना करते, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे. फक्त एखादा देशच नाही तर संपुर्ण जगात शांतता कायम राहावी यासाठी मी पुन्हा प्राण देण्यास तयार आहे असं परखड मत मलाला युसूफजाई हिनं व्यक्त केलं. तालिबानी हल्ल्यातून बचावलेल्या मलालाने पहिल्यांदाच मुलाखत दिली. आता मी बोलू शकते,पाहू शकते, चालू शकते. माझ्यासाठी जगभरातून लोकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे शक्य झालं आहे. मी त्यांची आभारी आहे अशा शब्दात तिने सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर स्त्रियांसाठी शिक्षणासाठी लढा देणार आहे असा एल्गारही मलालाने केला. 9 ऑक्टोबर 12 रोजी मलाला हिला तालिबानी बंडखोरांनी गोळी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ती शाळेतून परतत असताना तालिबान्यांनी तिची बस अडवली आणि तिचं नाव घेत बेछूट गोळीबार केला. गोळी मलालाच्या डोक्याला लागून तिच्या खांद्यात गेली. पण यात ती बचावली. इंग्लंडमधल्या बर्मिंगहममधल्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे. 4 जानेवारीला तिला डिस्चार्ज मिळाला आहे. पण तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. यापुढे मलाला इंग्लंडमध्येच राहणार असल्याचं तिनं स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close