S M L

26/11 च्या हल्ल्यातील जखमी मदतीच्या प्रतीक्षेत

21 डिसेंबर, मुंबईगणेश गायकवाड26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना शासनानं तात्काळ मदत जाहीर केली आहे. मात्र कामा हॉस्पिटलमधल्या जखमी कर्मचारी हिराबाई जाधव यांची मदत रोखून धरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकजण जखमी तर 200च्या वर लोक मृत्यूमुखी पडले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात कामा हॉस्पिटलच्या कर्मचारी हिराबाई जाधव याही जखमी झाल्या. त्याच्या उजव्या हाताला गोळी चाटून गेली आणि हाताला आतमध्ये फ्रॅक्चर झालंय.मात्र या जखमेपेक्षा आपले सहकारी गमवल्याचं त्यांना अधिक दु:ख आहे.या हल्ल्यात जखमी झालेल्या हिराबाईना शासनाकडून 50 हजारांचा धनादेश देण्यात आला होतां मात्र खोटं बोलून शासनानं हा धनादेश परत घेतल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. या हल्ल्यातील जे जखमी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतायेत अशानांच शासनानं मदत जाहिर केली आहे. जखमींच्या यादीत हिराबाईचं नाव आहे. तरीही त्यांची मदत रोखली गेली. त्यामुळं शासनाची जखमीची नेमकी व्याख्या काय असा प्रश्न त्यांच्या मुलानं विचारलं आहे. जखमींच्या यादीत हिराबाई यांच नाव असतानाही शासनानं त्यांचा धनादेशाचं पेमेन्ट थांबवलं आहे. 26/11 नंतर लगेचच या हल्ल्यातील पीडितांना शासनानं मदत जाहीर केली. त्याबद्दल स्वत:ची पाठही थोपटून घेतली. पण कागदावरची ही मदत प्रत्यक्ष पीडितांना मात्र मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2008 05:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2008 05:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close