S M L

मंदीतही ओरंगाबादमध्ये मद्य विक्रीत वाढ

21 डिसेंबर, औरंगाबादसंजय वरकडजागतिक मंदीची टांगती तलवार अनेक उद्योगांवर आहे. पण या मंदीच्या काळातही औरंगाबादमधे देशी- विदेशी मद्य आणि बिअरचं उत्पादन आणि विक्रीही वाढली आहे. मंदी असतानाही वाढलेली मद्यविक्री पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.मद्य बनविणार्‍या पाच आणि बिअर बनविणार्‍या सहा कंपन्या औरंगाबादेत आहेत. या वर्षातही औरंगाबादेत दोन नव्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. या सगळ्या कंपन्यांचं उत्पादन एप्रिल महिन्यांपासून वाढलं आहे. त्यात उत्पादन, विक्री आणि महसूल विक्रीतील वाढ अशी आहे देशी मद्याचं उत्पादन सात टक्के तर विक्री आणि महसूल आठ टक्के वाढला आहे. विदेशी मद्याचं उत्पादन 26 टक्के, विक्री 25 टक्के आणि महसूलात 22 टक्के वाढ झाली आहे. तर बीअरच्या उत्पादन, विक्री आणि महसूलात सरासरी अकरा टक्के वाढ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर या काळात 87 कोटी रूपयांचा अधिक महसूल मिळाला आहे. "जागतिक मंदीच्या काळातही औरंगाबादमध्ये ज्या विदेशी मद्य उत्पादन करणार्‍या कंपन्या आहेत त्यांचं उत्पादन 25 टक्यांनी वाढलंय. देशी मद्य उत्पादनातही आठ टक्के वाढ झालीय. औरंगाबादमध्ये सहा बिअर निर्माण्या आहेत. त्यांच उत्पादन व महसूल अकरा टक्क्यांनी वाढलं आहे. पाचशे चाळीस कोटींचा महसूल एप्रिल ते नोव्हेंबर या काळात मिळाला" असं औरंगाबादच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त व्ही जी इंदिसे यांनी सांगितलं.युरोपीयन बाजारपेठेत बिअर विक्रीत दोन टक्के घट होत असताना, आपल्याकड मात्र विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. एकूणच जागतिक मंदी असतानाही महाराष्ट्रात मात्र मद्यविक्रीचा आलेख चढता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2008 05:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2008 05:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close