S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शिवजयंतीसाठी जमलेल्या निधीतून जनावरांना चारा वाटप
  • शिवजयंतीसाठी जमलेल्या निधीतून जनावरांना चारा वाटप

    Published On: Feb 20, 2013 02:59 PM IST | Updated On: Feb 20, 2013 02:59 PM IST

    20 फेब्रुवारीरयतेचं कल्याण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश शिर्डीजवळच्या लोणी गावातल्या पद्मश्री विखेपाटील युवा मंचनं प्रत्यक्षात उतरवला आहे. एकीकडे राज्यात दुष्काळ असताना ढोलताशा किंवा बॅन्जोच्या थाटामाटात शिवजयंती साजरी करणं या तरुणांना पटलं नाही. म्हणून त्यांनी मोठ्या धडाक्यात शिवजयंती साजरी करण्याऐवजी शिवजयंतीसाठी जमा केलेला तब्बल 1 लाखाचा निधी जनावरांच्या चारापाण्यासाठी दिला. विखेपाटील युवा मंचाच्या या उपक्रमाबद्दल लोणीतल्या शेतकर्‍यांनीही समाधान व्यक्त केलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close