S M L
  • साखळी स्फोटांनी हैदराबाद हादरलं

    Published On: Feb 21, 2013 03:20 PM IST | Updated On: Feb 21, 2013 03:20 PM IST

    21 फेब्रुवारीआंध्रप्रदेशची राजधानी हैदराबाद दोन साखळी स्फोटांनी हादरले. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट झाले आहे. या स्फोटात 12 जण ठार तर 57 हून अधिक जण जखमी झाले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. तसंच आम्हाला 2 दिवसांपूर्वी स्फोटांची माहिती मिळाली होती, पण नेमके कोठे होणार याबद्दल माहिती नव्हती अशी कबुलीही शिंदे यांनी दिली. शहराबाहेर अत्यंत गर्दीने गजबजलेल्या दिलसुखनगर भागात संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी वेंकटाद्री या सिनेमागृहाजवळ पहिला स्फोट झाला. यानंतर काही सेकंदातच कोणार्क सिनेमागृहाजवळ स्फोट झाला. या दोन्ही सिनेमागृहात फक्त 500 मिटरचे अंतर होते. गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकं सायकलीच्या कॅरिअरवर ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार या दोन्ही भागात स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज झाला. घटनास्थळावर डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोध पथक दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेऊन संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळावर आध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी धाव घेतली. जखमींना 35 जणांना ओस्मानिया हॉस्पिटल, 12 जखमींना यशोदा हॉस्पिटल ओम्नी हॉस्पिटलमध्ये 15 जणांना दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close