S M L

ट्रायडन्ट हॉटेल पुन्हा सुरु

21 डिसेंबर, मुंबई ' हॉटेल मॅनेजमेंटला सुरक्षेसाठी सरकारकडून कुठलीही मदत लागल्यास ती आम्ही देऊ. सुरक्षेबाबत जनतेनं घाबरण्याची गरज नाही. भविष्यात दहशतवादी हल्ला टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील ', असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या सर्वधर्मीय प्रार्थनेनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य ठरलेलं ट्रायडन्ट हॉटेल हे आजपासून पुन्हा सुरू झालंय. त्यानिमित्त आयोजित सर्वधर्मीय प्रार्थनेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यात ट्रायडन्ड हॉटेल हे दहशतवाद्यांचं लक्ष्य ठरलं होतं. हल्ल्यातून सावरुन ट्रायडन्ट पुन्हा सुरु झालंय.' हॉटेल व्यवस्थापनाला सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा कर्मचार्‍यांना शस्त्रास्त्र परवानगी आणि इतर काही गरज असल्यास सरकार मदत करेल ', असं मुख्यमंत्री म्हणाले. ट्रायडन्ट हॉटेलच्या लॉबीत अर्धा तास सर्वधर्मीय प्रार्थना झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2008 12:35 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2008 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close