S M L

'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद

28 फेब्रुवारीकामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी आज पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्र वगळता या संपाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पण डाव्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पश्चिम बंगाल आणि केरळला मात्र बंदचा मोठा फटका बसला आहे.वाढती महागाई, बेरोजगारी आणि खाजगीकरणाला विरोध अशा अनेक मागण्यांसाठी देशभरातल्या वेगवेगळ्या 11 संघटनांनी बंद पुकारला होता. बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांनी कडकडीत बंद पाळला. पण अत्यावश्यक सेवा सुरू राहिल्यामुळे मुंबईचं जनजीवन कोलमडलं नाही. व्यापार्‍यांनी भाग घेतल्याने काही ठिकाणी दुकानं बंद होती. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्मचार्‍यांनी आझाद मैदानात जमून निदर्शनं केली.मुंबईत गिरणी कामगारांनीही आपल्या मागण्यांसाठी या बंदमध्ये भाग घेतला. तर दुसरीकडे पुण्यातही बंदचा जनजीवनावर परिणाम झाला नाही. सरकारी कर्मचार्‍यांनी निदर्शनं केली. पण बंदमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला नाही. त्याचबरोबर उपराजधानी नागपूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाल, गांधीबाग या भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापुरात बँका, आणि पतसंस्थांचे व्यवहार ठप्प होते. सीटू,आयटक, शिवसेना कामगार संघटना प्रणित नाशिकमधल्या 105 कंपन्या बंद होत्या.महाराष्ट्रात बंदचा फारसा परिणाम झाला नाही. पण पश्चिम बंगाल आणि केरळला बंदचा सर्वाधिक फटका बसला. पश्चिम बंगालमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणीही हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये बस आणि ऑटो रस्त्यावर नसल्याने शुकशुकाट होता. राजधानी दिल्लीतही काही प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी बंद असल्यानं प्रवाशांचे हाल झाले. पण मुंबई आणि बंगळुरूत मात्र या बंदचा फारसा परिणाम झाला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2012 02:01 PM IST

'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद

28 फेब्रुवारी

कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी आज पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्र वगळता या संपाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पण डाव्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पश्चिम बंगाल आणि केरळला मात्र बंदचा मोठा फटका बसला आहे.

वाढती महागाई, बेरोजगारी आणि खाजगीकरणाला विरोध अशा अनेक मागण्यांसाठी देशभरातल्या वेगवेगळ्या 11 संघटनांनी बंद पुकारला होता. बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांनी कडकडीत बंद पाळला. पण अत्यावश्यक सेवा सुरू राहिल्यामुळे मुंबईचं जनजीवन कोलमडलं नाही. व्यापार्‍यांनी भाग घेतल्याने काही ठिकाणी दुकानं बंद होती. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्मचार्‍यांनी आझाद मैदानात जमून निदर्शनं केली.

मुंबईत गिरणी कामगारांनीही आपल्या मागण्यांसाठी या बंदमध्ये भाग घेतला. तर दुसरीकडे पुण्यातही बंदचा जनजीवनावर परिणाम झाला नाही. सरकारी कर्मचार्‍यांनी निदर्शनं केली. पण बंदमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला नाही. त्याचबरोबर उपराजधानी नागपूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाल, गांधीबाग या भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापुरात बँका, आणि पतसंस्थांचे व्यवहार ठप्प होते. सीटू,आयटक, शिवसेना कामगार संघटना प्रणित नाशिकमधल्या 105 कंपन्या बंद होत्या.

महाराष्ट्रात बंदचा फारसा परिणाम झाला नाही. पण पश्चिम बंगाल आणि केरळला बंदचा सर्वाधिक फटका बसला. पश्चिम बंगालमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणीही हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये बस आणि ऑटो रस्त्यावर नसल्याने शुकशुकाट होता. राजधानी दिल्लीतही काही प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी बंद असल्यानं प्रवाशांचे हाल झाले. पण मुंबई आणि बंगळुरूत मात्र या बंदचा फारसा परिणाम झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2012 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close