S M L

'ते 1 कोटी' रुपये काँग्रेस कार्यालयातून'

28 फेब्रुवारीअमरावतीमध्ये सापडलेल्या 1 कोटी रुपये प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. या पैशांशी आपला संबंध नसल्याचे राजेंद्र मुळक यांनी स्पष्ट केलं आहे. मी, अटक करण्यात आलेल्या आशिष बोधनकर याला ओळखत नाही, है पैसै माझ्या घरातून नव्हे तर थेट काँग्रेस कार्यालयातून गेले असं राजेंद्र मुळक यांनी म्हटलं आहे. त्यांनी तसा लेखी जबाबही पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. मुळक आज पोलीस आयुक्तांपुढे चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर झाले नाहीत. त्याच्यावतीने ऍडव्होकेट जगताप यांनी मुळक यांचा जबाब सादर केला. याप्रकरणी अटक केलेल्या आशिष बोधनकर यानं हे पैसै मुळक यांनी मला अमरावतीला पोहोचवण्यासाठी सांगितलं होत असा जबाब पोलिसांकडे दिला होता. या सर्वांच्या जबाबात तफावत असल्याचं जिल्हाधिकार्‍यांनी म्हटलं आहे. तर दूसरीकडे प्रदेश काँग्रेस समितीचे महासचिव गणेश पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांपुढे लेखी जबाब दिला. जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपये काँग्रेस समितीने पाठवले होते. स्थानिक कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून हा निधी गोळा केला होता अस त्यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2012 11:28 AM IST

'ते 1 कोटी' रुपये काँग्रेस कार्यालयातून'

28 फेब्रुवारी

अमरावतीमध्ये सापडलेल्या 1 कोटी रुपये प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. या पैशांशी आपला संबंध नसल्याचे राजेंद्र मुळक यांनी स्पष्ट केलं आहे. मी, अटक करण्यात आलेल्या आशिष बोधनकर याला ओळखत नाही, है पैसै माझ्या घरातून नव्हे तर थेट काँग्रेस कार्यालयातून गेले असं राजेंद्र मुळक यांनी म्हटलं आहे. त्यांनी तसा लेखी जबाबही पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. मुळक आज पोलीस आयुक्तांपुढे चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर झाले नाहीत. त्याच्यावतीने ऍडव्होकेट जगताप यांनी मुळक यांचा जबाब सादर केला. याप्रकरणी अटक केलेल्या आशिष बोधनकर यानं हे पैसै मुळक यांनी मला अमरावतीला पोहोचवण्यासाठी सांगितलं होत असा जबाब पोलिसांकडे दिला होता. या सर्वांच्या जबाबात तफावत असल्याचं जिल्हाधिकार्‍यांनी म्हटलं आहे. तर दूसरीकडे प्रदेश काँग्रेस समितीचे महासचिव गणेश पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांपुढे लेखी जबाब दिला. जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपये काँग्रेस समितीने पाठवले होते. स्थानिक कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून हा निधी गोळा केला होता अस त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2012 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close