S M L

महापौरांच्या खुर्चीसाठी भाजपचं दबावतंत्र !

विनोद तळेकर, मुंबई28 फेब्रुवारीमुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे तर निश्चित झालं आहे. पण महापौर कोण होणार हा खरा प्रश्न आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 31 जागा जिंकल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता भाजपने थेट मुंबईच्या महापौरपदाची मागणी शिवसेनेकडे केली आहे. त्याबाबत आज मातोश्रीवर एक बैठकही झाली. पण भाजपच्या या मागणीचा खरंच विचार होऊ शकतो का, की फक्त शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी भाजपने ही मागणी केली.'मुंबईत महापौरपदाची एक टर्म भाजपला द्यावी ' मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाजपच्या विजयी मेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी ही मागणी केली. लगोलग त्यांच्या या मागणीला प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला.आणि ही मागणी आपण उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालू असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.मुंबईत गेल्या महापालिकेत भाजपचे 28 नगरसेवक होते. त्या तुलनेत हा आकडा या महापालिकेत तीननं वाढून 31 वर गेला. तसेचभाजपचा एक बंडखोर उमेदवारही निवडून आला आहे. गेल्यावेळच्या तुलनेत भाजपच्या मतदानाची टक्केवारीही 18%नी वाढली आहे.भाजपच्या मागणीवर सध्यातरी सेनेत शांतता आहे. कोणताही नेता यावर प्रतिक्रिया देत नाही. कदाचित भाजपच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून शिवसेनेनं मौनव्रत आरंभलं असावं. भाजपचं दबावतंत्रआधी भाजपचे 28 नगरसेवक यावर्षी भाजपचे 31नगरसेवक भाजपचा 1 बंडखोर उमेदवारआधीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत 18%नी वाढ

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2012 06:08 PM IST

महापौरांच्या खुर्चीसाठी भाजपचं दबावतंत्र !

विनोद तळेकर, मुंबई

28 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे तर निश्चित झालं आहे. पण महापौर कोण होणार हा खरा प्रश्न आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 31 जागा जिंकल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता भाजपने थेट मुंबईच्या महापौरपदाची मागणी शिवसेनेकडे केली आहे. त्याबाबत आज मातोश्रीवर एक बैठकही झाली. पण भाजपच्या या मागणीचा खरंच विचार होऊ शकतो का, की फक्त शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी भाजपने ही मागणी केली.

'मुंबईत महापौरपदाची एक टर्म भाजपला द्यावी ' मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाजपच्या विजयी मेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी ही मागणी केली. लगोलग त्यांच्या या मागणीला प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला.आणि ही मागणी आपण उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालू असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मुंबईत गेल्या महापालिकेत भाजपचे 28 नगरसेवक होते. त्या तुलनेत हा आकडा या महापालिकेत तीननं वाढून 31 वर गेला. तसेचभाजपचा एक बंडखोर उमेदवारही निवडून आला आहे. गेल्यावेळच्या तुलनेत भाजपच्या मतदानाची टक्केवारीही 18%नी वाढली आहे.

भाजपच्या मागणीवर सध्यातरी सेनेत शांतता आहे. कोणताही नेता यावर प्रतिक्रिया देत नाही. कदाचित भाजपच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून शिवसेनेनं मौनव्रत आरंभलं असावं.

भाजपचं दबावतंत्रआधी भाजपचे 28 नगरसेवक यावर्षी भाजपचे 31नगरसेवक भाजपचा 1 बंडखोर उमेदवारआधीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत 18%नी वाढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2012 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close