S M L

तीन बँका करतात काळा पैसा पांढरा

14 मार्चखाजगी बँक'किंग' क्षेत्रातील अग्रगण्य एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस या देशातल्या तीन मोठ्या खाजगी बँका मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या असल्याचा आरोप कोब्रापोस्ट या वेबसाईटनं केला. या बँका उघडपणे ग्राहकांना काळ्या पैशांचं रुपांतर पांढर्‍या पैशांत करून देतात असं कोब्रापोस्टनं म्हटलंय. त्यासाठी या बँका आयकर कायदा, फेमा, रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वं, केवायसी तत्वं, बँकिंग कायदा आणि प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्टचं सर्रास उल्लंघन करतात. या वेबसाईटने यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं असून शेकडो तासांचे फुटेज आमच्याकडं उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, ICICI नं या प्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमली असून दोन आठवड्यांत अहवाल मागवला आहे. बँकेचे धाबे दणाणले दरम्यान, कोब्रापोस्टच्या दाव्याची गंभीर दखल घेऊन त्याची उच्च पातळीवर चौकशी सुरू केलेली आहे अशी माहिती तिन्ही बँकांनी दिलीय. आम्ही उच्च व्यावसायिक मूल्यांचं पालन करतो, त्यांचे झालेले उल्लंघन गांभीर्याने घेतलं असल्याचं ऍक्सिस बँकेमार्फत सांगण्यात आलं. तर प्रसारमाध्यमांतल्या बातम्यांची आम्ही गांभीर्यानं दखल घेतलीय. नो युवर कस्टमर आणि मनी लाँडरींगविरोधातले एचडीएफसी बँकेचे धोरण स्पष्ट आहे. ज्या कर्मचार्‍यांनी त्यांचं उल्लंघन केलं असेल त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जात आहे असं एचडीएफसीमार्फत सांगण्यात आलं. तर आयसीआयसीआय बँकेनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमल्याचं जाहीर केलंय. त्याचा अहवाल दोन आठवड्यांमध्ये जाहीर केला जाईल. बँकांकडून नियमांचं उल्लंघननेटवर्क 18 ला रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेनं या तीन बँकांनी नो युवर कस्टमरच्या नियमांचे उल्लंघन केलंय का याची दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये माहिती घेतली. त्यामध्ये त्यांनी या केवायसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं. त्यानंतर एका बँकेला तीन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र या बँका मनी लाँडरींगमध्ये गुंतलेल्या आहेत का याची चौकशी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2013 10:06 AM IST

तीन बँका करतात काळा पैसा पांढरा

14 मार्च

खाजगी बँक'किंग' क्षेत्रातील अग्रगण्य एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस या देशातल्या तीन मोठ्या खाजगी बँका मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या असल्याचा आरोप कोब्रापोस्ट या वेबसाईटनं केला. या बँका उघडपणे ग्राहकांना काळ्या पैशांचं रुपांतर पांढर्‍या पैशांत करून देतात असं कोब्रापोस्टनं म्हटलंय. त्यासाठी या बँका आयकर कायदा, फेमा, रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वं, केवायसी तत्वं, बँकिंग कायदा आणि प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्टचं सर्रास उल्लंघन करतात. या वेबसाईटने यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं असून शेकडो तासांचे फुटेज आमच्याकडं उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, ICICI नं या प्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमली असून दोन आठवड्यांत अहवाल मागवला आहे.

बँकेचे धाबे दणाणले

दरम्यान, कोब्रापोस्टच्या दाव्याची गंभीर दखल घेऊन त्याची उच्च पातळीवर चौकशी सुरू केलेली आहे अशी माहिती तिन्ही बँकांनी दिलीय. आम्ही उच्च व्यावसायिक मूल्यांचं पालन करतो, त्यांचे झालेले उल्लंघन गांभीर्याने घेतलं असल्याचं ऍक्सिस बँकेमार्फत सांगण्यात आलं. तर प्रसारमाध्यमांतल्या बातम्यांची आम्ही गांभीर्यानं दखल घेतलीय. नो युवर कस्टमर आणि मनी लाँडरींगविरोधातले एचडीएफसी बँकेचे धोरण स्पष्ट आहे. ज्या कर्मचार्‍यांनी त्यांचं उल्लंघन केलं असेल त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जात आहे असं एचडीएफसीमार्फत सांगण्यात आलं. तर आयसीआयसीआय बँकेनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमल्याचं जाहीर केलंय. त्याचा अहवाल दोन आठवड्यांमध्ये जाहीर केला जाईल.

बँकांकडून नियमांचं उल्लंघन

नेटवर्क 18 ला रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेनं या तीन बँकांनी नो युवर कस्टमरच्या नियमांचे उल्लंघन केलंय का याची दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये माहिती घेतली. त्यामध्ये त्यांनी या केवायसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं. त्यानंतर एका बँकेला तीन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र या बँका मनी लाँडरींगमध्ये गुंतलेल्या आहेत का याची चौकशी करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2013 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close