S M L

'डेडलाईन' संपली, अजूनही होर्डिंग लटकलेलीच

14 मार्चबेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला 24 तास पूर्ण झाले आहेत. पण मुदत उलटून गेली तरी होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई अजूनही सुरूच आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 400 तर नाशिकमध्ये फक्त 68 होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. मुंबई, पुणे आणि ठाण्यातही होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चौधरी उद्या हायकोर्टात अवमान याचिका दाखल करणार आहेत. बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात प्रभाकर चौधरी, सातार्‍यातल्या सुस्वराज फाऊंडेशन यांच्यासह अनेकांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सर्व पालिकांना 24 तासांत होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश दिले होते. पण होर्डिंग्जची संख्या पाहता कारवाईची मुदत वाढवून देण्याची मागणी मुंबई महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात केली. त्यावर सातारा पालिकेला जे जमलं ते इतर पालिकांना का जमत नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला. सातारा पालिकेला हायकोर्टाने होर्डिंग्ज हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. पण पालिकेने आठवड्याभरातच ही कारवाई पूर्ण केली. यावर समाधान व्यक्त करताना कोर्टाने मुंबई महापालिकेला खडसावलं. केवळ प्रतिज्ञापत्रं सादर करू नका, कारवाई काय केली ते दाखवा, असं कोर्टानं बजावलं. इच्छा असेल तर कारवाईला 24 तास पुरेसे आहेत, असं कोर्टानं म्हटलंय. याप्रकरणाची सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2013 04:38 PM IST

'डेडलाईन' संपली, अजूनही होर्डिंग लटकलेलीच

14 मार्च

बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला 24 तास पूर्ण झाले आहेत. पण मुदत उलटून गेली तरी होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई अजूनही सुरूच आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 400 तर नाशिकमध्ये फक्त 68 होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. मुंबई, पुणे आणि ठाण्यातही होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चौधरी उद्या हायकोर्टात अवमान याचिका दाखल करणार आहेत. बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात प्रभाकर चौधरी, सातार्‍यातल्या सुस्वराज फाऊंडेशन यांच्यासह अनेकांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सर्व पालिकांना 24 तासांत होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश दिले होते. पण होर्डिंग्जची संख्या पाहता कारवाईची मुदत वाढवून देण्याची मागणी मुंबई महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात केली. त्यावर सातारा पालिकेला जे जमलं ते इतर पालिकांना का जमत नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला. सातारा पालिकेला हायकोर्टाने होर्डिंग्ज हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. पण पालिकेने आठवड्याभरातच ही कारवाई पूर्ण केली. यावर समाधान व्यक्त करताना कोर्टाने मुंबई महापालिकेला खडसावलं. केवळ प्रतिज्ञापत्रं सादर करू नका, कारवाई काय केली ते दाखवा, असं कोर्टानं बजावलं. इच्छा असेल तर कारवाईला 24 तास पुरेसे आहेत, असं कोर्टानं म्हटलंय. याप्रकरणाची सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2013 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close