S M L

घरात घुसून तरुणीवर सामूहिक बलात्कार

14 मार्चमुंबई : देशभरात महिलावरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. मुंबईत एका तरूणीवर तिच्या मित्राच्या समोर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. हा प्रकार विलेपार्लेतल्या कबीरनगर वस्तीत घडला. या वस्तीत राहणार्‍या आपल्या मित्राला भेटायला ही तरूणी आली होती. रात्री दोन वाजण्याच्या 4 तरूणांनी दरवाजा ठोठावला. तेव्हा तरुणीच्या मित्रानं दरवाजा उघडताच आरोपींनी त्याला धक्काबुक्की करून शेजारच्या खोलीत कोंडून ठेवलं. यानंतर चाकूचा धाक दाखवून तरूणीवर रात्रभर बलात्कार केला. सकाळी तरूणीच्या मित्राने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी ताबडतोब घरी येऊन मुलीची सुटका केली आणि आरोपींना तात्काळ अटक केली. राजेश वर्मा, रामचंद्र हुबे, महेश केवट आणि श्रीकृष्णा केवट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावर बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौघांनाही 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2013 11:02 AM IST

घरात घुसून तरुणीवर सामूहिक बलात्कार

14 मार्च

मुंबई : देशभरात महिलावरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. मुंबईत एका तरूणीवर तिच्या मित्राच्या समोर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. हा प्रकार विलेपार्लेतल्या कबीरनगर वस्तीत घडला. या वस्तीत राहणार्‍या आपल्या मित्राला भेटायला ही तरूणी आली होती. रात्री दोन वाजण्याच्या 4 तरूणांनी दरवाजा ठोठावला. तेव्हा तरुणीच्या मित्रानं दरवाजा उघडताच आरोपींनी त्याला धक्काबुक्की करून शेजारच्या खोलीत कोंडून ठेवलं. यानंतर चाकूचा धाक दाखवून तरूणीवर रात्रभर बलात्कार केला. सकाळी तरूणीच्या मित्राने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी ताबडतोब घरी येऊन मुलीची सुटका केली आणि आरोपींना तात्काळ अटक केली. राजेश वर्मा, रामचंद्र हुबे, महेश केवट आणि श्रीकृष्णा केवट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावर बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौघांनाही 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2013 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close