S M L

असा होतो काळा पैसा पांढरा

14 मार्चखाजगी बँकेच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणार्‍या तीन प्रसिद्ध बँका एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस या चांगल्याच्या अडचणीत सापडल्या आहे. या बँकातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा केला जातो असा गौप्यस्फोट 'कोब्रापोस्ट'ने केला आहे. या बँका उघडपणे ग्राहकांना काळ्या पैशांचं रुपांतर पांढर्‍या पैशांत करून देतात असं कोब्रापोस्टनं उघड केलं आहे. या बँकेत काळा पैसा पांढरा होता कसा याबद्दलचा हा खुलासा..अशी आहे काळ्या पैशांचे रुपांतर पांढर्‍या पैशात करण्याची या बँकांची पद्धत- काळा पैसा बेकायदेशीर डिपॉझीट, विमा आणि गुंतवणूक योजनांद्वारे पांढरा केला जातो- मोठ्या प्रमाणात काळा पैसा स्वीकारून तो विमा आणि सोन्यामध्ये गुंतवला जातो- हा पैसा बँकांच्या विविध योजनांमध्ये वळवण्यासाठी खाते उघडले जाते, त्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक नाही. तसंच नो युवर कस्टमरअंतर्गत रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन केले जाते- हा पैसा लहान लहान रक्कमांमध्ये विभागून, कोणताही सुगावा न ठेवता बँक प्रणालीमध्ये आणला जातो. त्याासाठी बेनामी खाते किंवा इतर ग्राहकांच्या खात्यांचा वापर केला जातो - ग्राहकाच्या खात्यात गुंतवणूक दिसणार नाही याची काळजी घेण्यासाठी धनादेशांचा वापर केला जातो- गुंतवणूकदाराची ओळख गुप्त ठेवली जाते, सोयीनुसार अनेक खाती उघडली आणि बंद केली जातात - काळा पैसा निरनिराळ्या नावाने योजनांमध्ये गुंतवला जातो - करोडो रुपयांची रोख रक्कम ठेवण्यासाठी विशेष आकारांचे लॉकर्स पुरवली जातात. ग्राहकाची ओळख लपवण्यासाठी बँकांच्या वेळेव्यतिरिक्त ही लॉकर उघडली जातात - काळा पैसा घेण्यासाठी प्रसंगी बँकेचे अधिकारी, काउंटिंग मशिन घेऊन ग्राहकाच्या घरी जातात - काळा पैसा एनआरई. एनआरओ खात्यांद्वारे, तसेच इतर मार्गांनी परदेशात पाठवला जातो

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2013 12:02 PM IST

असा होतो काळा पैसा पांढरा

14 मार्च

खाजगी बँकेच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणार्‍या तीन प्रसिद्ध बँका एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस या चांगल्याच्या अडचणीत सापडल्या आहे. या बँकातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा केला जातो असा गौप्यस्फोट 'कोब्रापोस्ट'ने केला आहे. या बँका उघडपणे ग्राहकांना काळ्या पैशांचं रुपांतर पांढर्‍या पैशांत करून देतात असं कोब्रापोस्टनं उघड केलं आहे. या बँकेत काळा पैसा पांढरा होता कसा याबद्दलचा हा खुलासा..

अशी आहे काळ्या पैशांचे रुपांतर पांढर्‍या पैशात करण्याची या बँकांची पद्धत- काळा पैसा बेकायदेशीर डिपॉझीट, विमा आणि गुंतवणूक योजनांद्वारे पांढरा केला जातो- मोठ्या प्रमाणात काळा पैसा स्वीकारून तो विमा आणि सोन्यामध्ये गुंतवला जातो- हा पैसा बँकांच्या विविध योजनांमध्ये वळवण्यासाठी खाते उघडले जाते, त्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक नाही. तसंच नो युवर कस्टमरअंतर्गत रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन केले जाते- हा पैसा लहान लहान रक्कमांमध्ये विभागून, कोणताही सुगावा न ठेवता बँक प्रणालीमध्ये आणला जातो. त्याासाठी बेनामी खाते किंवा इतर ग्राहकांच्या खात्यांचा वापर केला जातो - ग्राहकाच्या खात्यात गुंतवणूक दिसणार नाही याची काळजी घेण्यासाठी धनादेशांचा वापर केला जातो- गुंतवणूकदाराची ओळख गुप्त ठेवली जाते, सोयीनुसार अनेक खाती उघडली आणि बंद केली जातात - काळा पैसा निरनिराळ्या नावाने योजनांमध्ये गुंतवला जातो - करोडो रुपयांची रोख रक्कम ठेवण्यासाठी विशेष आकारांचे लॉकर्स पुरवली जातात. ग्राहकाची ओळख लपवण्यासाठी बँकांच्या वेळेव्यतिरिक्त ही लॉकर उघडली जातात - काळा पैसा घेण्यासाठी प्रसंगी बँकेचे अधिकारी, काउंटिंग मशिन घेऊन ग्राहकाच्या घरी जातात - काळा पैसा एनआरई. एनआरओ खात्यांद्वारे, तसेच इतर मार्गांनी परदेशात पाठवला जातो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2013 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close