S M L

'यूपीएससी'ची माघार, मराठीत पेपर होणारच

15 मार्चअखेर यूपीएससीची परीक्षा फक्त इंग्रजीमधून घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यंमत्री नारायण सामी यांनी लोकसभेत ही घोषणा केली. यूपीएससीची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये न घेता फक्त इंग्रजीमध्ये घेण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने घेतला होता. त्याला देशभरातून विरोध झाला होता. संसदेतही त्याचे पडसाद उमटले. आज लोकसभेमध्ये विरोधकांनी हा विषय उपस्थित केला. त्यावरील चर्चेनंतर नारायण सामी यांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा केली. युपीएससीच्या (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आला होता. आयोगाने प्रादेशिक भाषांचा पर्यायच काढून टाकण्याचा अजब निर्णय घेतला होता. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाईटवर सादर केलेल्या नव्या अभ्यासक्रमावरुन हे स्पष्ट झालंय. पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषयांची निवड करणे अत्यावश्यक होते. त्यामध्ये इंग्रजी आणि कोणतीही एक प्रादेशिक भाषा यांच्या समावेष होता. भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याला किमान एक तरी भारतीय भाषेची चांगली येत असावी असा त्यामागे हेतू होता. नव्या अभ्यासक्रमात या दोन विकल्पांना फाटा देण्यात आल्याने प्रादेशिक भाषा हा विषयच बाद करण्यात आल्याचं स्पष्टं झालं होतं. यूपीएससीच्या या निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा विकल्प रद्द करू नका या मागणीसाठी शिवसेना,मनसेनं कडाडून विरोध केला होता. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाली होती. तसंच शिवसेनेनं एक निवेदन खासदारांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयात देण्यात आलं. अखेर यूपीएससीने आपला निर्णय मागे घेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता 26 मे रोजी यूपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2013 10:07 AM IST

'यूपीएससी'ची माघार, मराठीत पेपर होणारच

15 मार्च

अखेर यूपीएससीची परीक्षा फक्त इंग्रजीमधून घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यंमत्री नारायण सामी यांनी लोकसभेत ही घोषणा केली. यूपीएससीची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये न घेता फक्त इंग्रजीमध्ये घेण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने घेतला होता. त्याला देशभरातून विरोध झाला होता. संसदेतही त्याचे पडसाद उमटले. आज लोकसभेमध्ये विरोधकांनी हा विषय उपस्थित केला. त्यावरील चर्चेनंतर नारायण सामी यांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा केली.

युपीएससीच्या (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आला होता. आयोगाने प्रादेशिक भाषांचा पर्यायच काढून टाकण्याचा अजब निर्णय घेतला होता. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाईटवर सादर केलेल्या नव्या अभ्यासक्रमावरुन हे स्पष्ट झालंय. पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषयांची निवड करणे अत्यावश्यक होते. त्यामध्ये इंग्रजी आणि कोणतीही एक प्रादेशिक भाषा यांच्या समावेष होता. भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याला किमान एक तरी भारतीय भाषेची चांगली येत असावी असा त्यामागे हेतू होता. नव्या अभ्यासक्रमात या दोन विकल्पांना फाटा देण्यात आल्याने प्रादेशिक भाषा हा विषयच बाद करण्यात आल्याचं स्पष्टं झालं होतं.

यूपीएससीच्या या निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा विकल्प रद्द करू नका या मागणीसाठी शिवसेना,मनसेनं कडाडून विरोध केला होता. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाली होती. तसंच शिवसेनेनं एक निवेदन खासदारांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयात देण्यात आलं. अखेर यूपीएससीने आपला निर्णय मागे घेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता 26 मे रोजी यूपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2013 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close