S M L

कोर्टाच्या आदेशाला मनसेसैनिकांचा ठेंगा

15 मार्चनागपूर : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्यभरात महापालिकांनी होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पण हायकोर्टाच्या या आदेशाला नागपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी ठेंगा दाखवला आहे. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत. दरम्यान, हायकोर्टाच्या आदेशानंतर सहा महापालिकांमधील 5 हजार 65 होर्डिंग्ज हटवण्यात आल्याची माहिती आज कोर्टात देण्यात आली. या कारवाईवर कोर्टाने समाधान व्यक्त केलं आहे. पण दुसरीकडे मनसेसैनिकांनी आपल्या अध्यक्षांच्या स्वागतासाठी नियमांचे उल्लंघन केलं आहे. राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आजपासून सुरु होतोय. या दौर्‍यादरम्यान राज ठाकरेंची 24 तारखेला अमरावती येथे जाहीर सभा आहे. पक्षबांधणी आणि राज्यातली दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंचा हा राज्यव्यापी दौरा सुरु झाला आहे. या राज्यव्यापी दौर्‍याचा पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्र,कोकण आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा एक प्रकारे राज्यातल्या विविध भागांची चाचपणी करण्याचा हा भाग आहे. आज विमानाने ते नागपूरमध्ये दाखल होणार आहे त्यांनंतर संध्याकाळी चंद्रपूरला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2013 12:31 PM IST

कोर्टाच्या आदेशाला मनसेसैनिकांचा ठेंगा

15 मार्च

नागपूर : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्यभरात महापालिकांनी होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पण हायकोर्टाच्या या आदेशाला नागपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी ठेंगा दाखवला आहे. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत. दरम्यान, हायकोर्टाच्या आदेशानंतर सहा महापालिकांमधील 5 हजार 65 होर्डिंग्ज हटवण्यात आल्याची माहिती आज कोर्टात देण्यात आली. या कारवाईवर कोर्टाने समाधान व्यक्त केलं आहे. पण दुसरीकडे मनसेसैनिकांनी आपल्या अध्यक्षांच्या स्वागतासाठी नियमांचे उल्लंघन केलं आहे.

राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आजपासून सुरु होतोय. या दौर्‍यादरम्यान राज ठाकरेंची 24 तारखेला अमरावती येथे जाहीर सभा आहे. पक्षबांधणी आणि राज्यातली दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंचा हा राज्यव्यापी दौरा सुरु झाला आहे. या राज्यव्यापी दौर्‍याचा पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्र,कोकण आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा एक प्रकारे राज्यातल्या विविध भागांची चाचपणी करण्याचा हा भाग आहे. आज विमानाने ते नागपूरमध्ये दाखल होणार आहे त्यांनंतर संध्याकाळी चंद्रपूरला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2013 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close