S M L

सुब्रतो रॉय यांना ताब्यात देण्याची सेबीची मागणी

15 मार्चदिल्ली : सहाराचे समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय सहारा अडचणीत आले आहेत. त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश द्या अशी विनंती मार्केट रेग्युलेटर सेबीनं सुप्रीम कोर्टाकडे केलीय. सहारा ग्रुपच्या दोन संचालकांना ताब्यात घेण्याचे आदेश द्यावे आणि या सर्वांना देश सोडण्यासाठी मनाई करण्याचे तसेच पासपोर्ट ताब्यात घेण्याचे आदेश देण्याची मागणी सेबीने केली. गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने सहाराच्या दोन कंपन्यांना दिले होते. पण या कंपन्यांनी ते आदेश पाळले नाहीत. त्यामुळे सेबीने सहाराविरोधात कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी पुढच्या महिन्यात होणार आहे. सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी परत केले नाहीत. त्यावरून सहारा समूह आणि सेबीमध्ये वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी पैसे परत करण्याची गेल्या नोव्हेंबरची मुदत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा मुदत वाढवून द्यायला कोर्टाने नकार दिला. त्यामुळे गेल्या 6 फेब्रुवारीला कोर्टाने सेबीला सहाराचे सहा अकाऊंट्स सील गोठवण्याची तसेच दोन कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली होती. सेबीच्या मागण्या काय आहेत आणि त्यामागची भूमिका काय आहे ?सेबीची मागणी- गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मागता यावेत, यासाठी सहारानं जाहिरात द्यावी- खर्‍या गुंतवणूकदारांना पैसे परत द्यावेकशासाठी?- सहारामध्ये किती खर्‍या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलीय, हे सेबीला शोधायचंयसेबीची मागणी- सहारानं केलेल्या मालमत्तांच्या विक्रिची छाननी करण्यासाठी विशेष अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मुभा सेबीला द्यावीकशासाठी?- गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक करण्यासाठीसेबीची मागणी- सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि संचालकांचे पासपोर्ट जप्त करावेतकशासाठी?- सुब्रतो रॉय आणि संचालकांनी पळून जाऊ नये यासाठीसहाराची सेबीवर टीका"सेबी दररोज हेतुपुरस्सर सहाराविषयी बदनामीकारक माहिती प्रसार माध्यमांना देतंय. या सगळ्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाहीये. काही तपास अधिकारी सहारा ग्रुपविरोधात आकसाने वागत आहेत."- सहारा

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2013 04:22 PM IST

सुब्रतो रॉय यांना ताब्यात देण्याची सेबीची मागणी

15 मार्च

दिल्ली : सहाराचे समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय सहारा अडचणीत आले आहेत. त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश द्या अशी विनंती मार्केट रेग्युलेटर सेबीनं सुप्रीम कोर्टाकडे केलीय. सहारा ग्रुपच्या दोन संचालकांना ताब्यात घेण्याचे आदेश द्यावे आणि या सर्वांना देश सोडण्यासाठी मनाई करण्याचे तसेच पासपोर्ट ताब्यात घेण्याचे आदेश देण्याची मागणी सेबीने केली.

गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने सहाराच्या दोन कंपन्यांना दिले होते. पण या कंपन्यांनी ते आदेश पाळले नाहीत. त्यामुळे सेबीने सहाराविरोधात कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी पुढच्या महिन्यात होणार आहे. सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी परत केले नाहीत. त्यावरून सहारा समूह आणि सेबीमध्ये वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी पैसे परत करण्याची गेल्या नोव्हेंबरची मुदत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा मुदत वाढवून द्यायला कोर्टाने नकार दिला. त्यामुळे गेल्या 6 फेब्रुवारीला कोर्टाने सेबीला सहाराचे सहा अकाऊंट्स सील गोठवण्याची तसेच दोन कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली होती.

सेबीच्या मागण्या काय आहेत आणि त्यामागची भूमिका काय आहे ?

सेबीची मागणी- गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मागता यावेत, यासाठी सहारानं जाहिरात द्यावी- खर्‍या गुंतवणूकदारांना पैसे परत द्यावे

कशासाठी?- सहारामध्ये किती खर्‍या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलीय, हे सेबीला शोधायचंय

सेबीची मागणी- सहारानं केलेल्या मालमत्तांच्या विक्रिची छाननी करण्यासाठी विशेष अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मुभा सेबीला द्यावी

कशासाठी?- गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक करण्यासाठीसेबीची मागणी- सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि संचालकांचे पासपोर्ट जप्त करावेत

कशासाठी?- सुब्रतो रॉय आणि संचालकांनी पळून जाऊ नये यासाठीसहाराची सेबीवर टीका

"सेबी दररोज हेतुपुरस्सर सहाराविषयी बदनामीकारक माहिती प्रसार माध्यमांना देतंय. या सगळ्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाहीये. काही तपास अधिकारी सहारा ग्रुपविरोधात आकसाने वागत आहेत."- सहारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2013 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close