S M L

शरद पवारांचा दुष्काळी दौरा 'घरापासून' सुरू

16 मार्चबारामती : केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सध्या त्यांच्या मतदारसंघाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. मंगळवेढा आणि सांगोला तालुक्याला पाणी देणार असल्याचं यावेळी शरद पवारांनी आश्वासन दिलं. शिवाय टेंभू-म्हैसाळलाही पाणी देणार असल्याचं शरद पवार म्हणाले. फळबागांसाठी हेक्टरी 30 हजारांचं अनुदान दिलं जाणार असल्याचं सांगतानाच चारा छावण्यांमधील जनावरांमागे 32 ऐवजी 50 रुपये इतकी वाढ केंद्र सरकारने केल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुणे जिल्ह्यातलं धरणांचं पाणी उजनी धरणात सोडणं शक्य नाही असं पवारांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या पाण्याच्या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार्‍या भैय्या देशमुख यांची मागणी पवारांनी फेटाळून लावलीय. उजनी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडणं शक्य नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2013 02:23 PM IST

शरद पवारांचा दुष्काळी दौरा 'घरापासून' सुरू

16 मार्च

बारामती : केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सध्या त्यांच्या मतदारसंघाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. मंगळवेढा आणि सांगोला तालुक्याला पाणी देणार असल्याचं यावेळी शरद पवारांनी आश्वासन दिलं. शिवाय टेंभू-म्हैसाळलाही पाणी देणार असल्याचं शरद पवार म्हणाले. फळबागांसाठी हेक्टरी 30 हजारांचं अनुदान दिलं जाणार असल्याचं सांगतानाच चारा छावण्यांमधील जनावरांमागे 32 ऐवजी 50 रुपये इतकी वाढ केंद्र सरकारने केल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुणे जिल्ह्यातलं धरणांचं पाणी उजनी धरणात सोडणं शक्य नाही असं पवारांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या पाण्याच्या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार्‍या भैय्या देशमुख यांची मागणी पवारांनी फेटाळून लावलीय. उजनी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडणं शक्य नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2013 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close