S M L

ज्येष्ठ कवी गंगाधर महाम्बरे कालवश

23 डिसेंबर, पुणे' पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे... ', ' संधीकाली या अशा... ' , ' शुभंकरोती कल्याणम्...' अशा सुरेल गीतांनी रसिकांच्या मनात आदराचं स्थान मिळवणारे गीतकार गंगाधर महाम्बरे यांचं पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. एका खासगी रुग्णालयात औषधोपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 55 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या 'मौलिक मराठी चित्रगीते ' या गीतसंग्रहाला सरकारचा 2003 सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या मागे, पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडं असा परिवार आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.31 जानेवारी 1931 रोजी ज्येष्ठ कवी गंगाधर महाम्बरे यांचा जन्म मालवण इथे झाला. इंग्रजी साहित्यातून बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी ग्रंथशास्त्राची पदवी घेतली. मुंबईतल्या एन्फिस्टन कॉलेजमध्ये ते ग्रंथपाल म्हण्‌ून रूजू झाले आहेत. त्यानंतर फिल्म इन्स्टिट्युटचे पहिले ग्रंथपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. महाम्बरे सरांनी किर्लोस्कर उद्योग समूहात करायला सुरुवात केली आहे. तिथून ते टेक्निकल ऑटोमोटिव्ह अ‍ॅबस्ट्रॅकमधील मासिकाचे प्रकाशक झाले. मिटकॉनच्या मासिकांच्या संपादकपदीही त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांची उष:काल (काव्यसंग्रह) , दिलजामाई (एकांकिका), संतांची कृपा (नाटक), हाऊ स्टार्ट स्मॉल स्केल इंडस्ट्री (उद्योगविषयक), कोकणासाठी लघुउद्योग, किशोरनामा, सेवासुविधा व्यवसाय,इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, मत्स्यव्यवसाय, 21 व्या शतकाचा इंग्रजी - मराठी शब्दकोश , चित्रपट क्षेत्रातला तांत्रिक शब्दांचा कोश, चार्ली चॅप्लिन, दादासाहेब फाळके, एक अविस्मरणीय मामा (व्यक्तिचित्रे), भावगीतकार ज्ञानेश्‍वर, मौनांकित इत्यादी शंभरहून अधिक प्रसिद्ध झालीत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ना.घ. देशपांडे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. चित्रपट महामंडळाच्या चित्ररत्न या पुरस्कारानं त्यांना गौरवलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 05:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 05:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close