S M L

जम्मूमध्ये तीन अतिरेक्यांना अटक

23 डिसेंबर, जम्मूजम्मूमध्ये तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही अतिरेकी जैश-ए-महम्मदच्या आत्मघातकी पथकातील असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातील गुलाम फरीद हा अतिरेकी पाकिस्तानच्या 10 एके रेजिमेंटचा सैनिक असल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. जम्मूतल्या एका हॉटेलमधून त्यांना पकडण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकांमध्ये अडथळे आणण्याचा या अतिरेक्यांचा प्लॅन होता, अशी माहिती जम्मूचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस कुलदीप खोडा यांनी दिली.गुलाम फरीद 2001 मध्ये पाकिस्तानी सैन्यात 2001 मध्ये शिपाई म्हणून सामील झाला आणि त्याचा बिल्ला नंबर 4319148 असल्याचं समजलं आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी लष्करातून जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेनं त्याला निवडलं. अजूनही तो पाकिस्तानी लष्कराचा सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. जैश-ए-महम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरचा छोटा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ याने या तिघांना दहशतवादी कारवायाचं प्रशिक्षण दिल्याचं चोकशीत समोर आलं आहे. रावळपिंडीमध्ये या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलं. तेथून ते कराचीला आले आणि विमानाने ढाक्याला गेले. बांग्लादेशच्या सीमेवरून त्यांनी भारतात प्रवेश केला. कोलकात्याहून ट्रेन पकडून ते जम्मूला पोहचले. सुरुवातीला रेल्वे स्टेशनजवळच्या हॉटेलमध्येच त्यांचं वास्तव्य होतं. नंतर आपला प्लॅन अंमलात आणण्यासाठी ते शहरात गेले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणखी एक दहशतवादी काश्मीरहून येणार होता, मात्र जोरदार हिमवृष्टीने जम्मूकडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने तो पेहचू शकला नाही. स्थानिक दहशतवाद्यांकडून त्यांना दारूगोळा आणि टार्गेट्स दिली जाणार होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.दोन दिवसांपूर्वीच जम्मू पोलिसांनी हरकत-उल-जिहादी-इस्लामी च्या म्होरक्यासहीत चार दहशतवाद्यांना जम्मू रेल्वे स्टेशनवरून अटक केली होती. जम्मू काश्मीरमध्ये 24 डिसेंबरला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 07:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 07:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close