S M L

जळगांवच्या अनुभुती स्कूलला ग्रीन स्कूल पुरस्कार

23 डिसेंबर, जळगावप्रशांत बागअवघ्या दोन वर्षांत जळगांवच्या ' अनुभुती स्कूल'ला तिस-या क्रमांकाचा ग्रीन स्कूल हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हॉयरमेंटच्या वतीनं अखील भारतीय पातळीवर या स्पर्धेचं आयोजन करण्यांत आलं होतं. या स्पर्धेत देशातल्या साडेपाच हजार शाळांनी भाग घेतला होता. स्पर्धेत बाझी मारली ती जळगावच्या भंवरलाल जैन यांच्या ' अनुभुती स्कूल 'नं. ग्रीन स्कूल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शाळांमधील ' अनुभुती स्कूल' ही एकमेव निवासी शाळा आहे.निसर्गाचं वरदान लाभलेली शाळा अशी जळगांवच्या अनुभुती स्कूलची ख्याती आहे. शंभर एकर जमिनीवर दिसणारा अनुभुती स्कूल 'चा रम्य परिसर हा दोन वर्षांपूर्वी हिरवाकंच अजिबातच नव्हता. पण शाळा व्यवस्थापनाची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जागरुकता यामुळे शाळेला हिरवाई अनुभवायला मिळाली आहे. शाळेभोवतीच्या हिरवाईबद्दल अनुभुतीच्या संचालिका निशा अनिल जैन सांगतात, "आजकाल ग्लोबल वॉर्मिंगवर इतकी चर्चा होते आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर फक्त चर्चा करून भागणार नाही. तर या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे. हा उपाय प्रत्यक्षात अमलात आणायला पाहिजे. हे आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना शिकवलं. यू मेक द डिफरन्स यू मेक द डिफरन्स इन द सोसायटी हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं.मुलांनी ते इतंकं मनावर घेतलं की त्यांनी झाडं लावून त्यांची काळजी घेऊन अनुभुतीचा परिसर हिरवागार केला. " ग्लोबल वॉर्मिंगमुळं विद्यार्थ्यांना पर्यावरण हा विषय सहज समजत आहे. त्यामुळे 'अनुभुती 'नं विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच पर्यावरणाबाबतची जागरुकता याचंही शिक्षण दिलं. याची प्रचिती अनुभुतीला लागलीच आली. देशातील साडेपाच हजार शाळांतून अनुभुती शाळेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.भारतातील टॉप थ्री ग्रीन स्कूलचा मान या शाळेला मिळालांय.पद्मश्री भंवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून हि शाळा साकारलीय.आठवीच्या या मुलांनी स्पर्धेत सादर केलेलं पाणी व्यावस्थापनाचं सादरिकरण उल्लेखनीय होतं. दिल्लीहून हा पुरस्कार घेउन आलेल्या चिमुरड्या विजेत्यांनी आपला हा पुरस्कार आपल्या दादाजींना म्हणजेच भंवरलाल जैन यांना अर्पण केला आहे. ऊर्जा बचतीसह पाणी, हवा, सौर उर्जा आणि सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त वापर, परिसर स्वच्छता,आरोग्य या प्रश्नांवर या मुलांशी स्पर्धा आयोजकांनी थेट संवाद साधला होता. याबाबत असलेल्या मुलांमधील जागरुकतेनं हा पुरस्कार अनुभुतीला मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 10:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close