S M L

कसाब पाकिस्तानी नाही- रहमान मलिक

23 डिसेंबर कसाब पाकिस्तानचा नागरिक असल्याचा पाकिस्ताननं पुन्हा इन्कार केला आहे. कुठल्याही, सरकारी ऑफीसमध्ये त्याच्या नावाची नोंद नसल्याचं पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहारमंत्री रहमान मलिक यांनी एका पत्रकारपरिषदेत सांगितलं. कसाबने लिहिलेलं पत्रं भारतानं पाकच्या उच्चालयाला पाठवलं आहे. त्यात कसाबनं स्वत: पाकिस्तानी असल्याचं कबूल केलं आहे. तसंचं कसाब पाकिस्तानी असल्याचं, पाकिस्तानी प्रसारमाध्यामांनीही उघड केल्यानंतरही, पाकिस्तानचा बनाव सुरूच आहे. दरम्यान इंटरपोलने मुंबई हल्ल्यांसंदर्भातली कोणतीही माहिती भारताने आम्हाला दिलेली नाही हे स्पष्ट केलं. इंटरपोलचे सेक्रेटरी जनरल रिचर्ड नोबल सद्या पाकिस्तानच्या दौ-यावर आहेत.इस्लामाबादेत बोलताना ते म्हणाले की भारतीय अधिका-यांनी अजून कोणतीही माहिती दिली नसल्यामुळे हल्लेखोर कोणत्या देशातले होते, हे आम्ही सांगू शकत नाही. इंटरपोलला माहिती द्यायची की नाही, हे भारताने ठरवायचं आहे, असं सांगत रिचर्ड नोबल यांनी पाकिस्तानची मात्र पाठ थोपटली. पाकिस्तान आम्हाला पूर्ण सहकार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 12:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close