S M L

युद्ध कुणालाच नकोय- डॉ. मनमोहन सिंग

23 डिसेंबर दिल्लीआशिष दीक्षितगेले कित्येक दिवस भारत पाकिस्तानशी युद्धाचे संकेत देत होता. पण पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं की भारताला युद्ध नकोय. पण त्यासाठी पाकिस्तानने आपल्या भूमीवर चालणा-या अतिरेकी कारवाया ताबडतोब थांबवाव्यात असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. मंगळवारी जगभरातल्या भारतीय राजदूतांच्या परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. अतिरेकी कारवायांना पाकिस्तान सरकारचा वरदहस्त प्राप्त आहे, असं पंतप्रधान म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केलं की युद्ध हे दोन्ही देशांच्या हिताचं नाही आणि म्हणूनच पाकिस्तानने आम्हाला सहकार्य करावं. थोडाही वेळ न दवडता पाकिस्तानने दहशतवाद्यांचं जाळं नष्ट करावं. हे भारत आणि पाकिस्तान दोघांच्याही हिताचं आहे.कारण युद्ध कुणालाच नकोय. पण पाकिस्तान मात्र आपल्या भूमिकेवर अडून बसलंय.मुंबई हल्ल्यांशी आमचा काहीही संबंध नव्हता आणि कसाब हा पाकिस्तानी नागरिक नाही असं पाकिस्तानने पुन्हा एकदा सांगितलं. इतक्या दिवस प्रणव मुखजीर्ंनी युद्धाची भाषा करूनही पाकिस्तानने सहकार्य केलं नाही. आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी थोडं नरमाईचं धोरण घेतलं आहे. यावर तरी पाकिस्तान सहकार्य करतोय का, हे लवकरच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 03:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close