S M L

'आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे'

19 मार्चआज विधानभवनाच्या प्रांगणात आमदारांनी एपीआयला केलेल्या मारहाणीच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कडक शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात विधिमंडळाच्या प्रांगणात लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकार्‍यावर हात उचलण्याचं कृत्य यापूर्वी कधीही केलं नव्हतं. मी 27 वर्षं या विधिमंडळाचा सदस्य होतो. त्या सदनामध्ये काही घटकांकडून असं कृत्य व्हावं, याची मला लाज वाटते. हे निषेधार्ह आहे अशा शब्दात शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच कायद्याच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा असून आमदारांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कारवाई करून हे एक कायद्याचं राज्य आहे याची प्रचिती महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली. शरद पवार यांनी आयबीएन लोकमतशी खास बातचीत केली यावेळी ते बोलत होते.शरद पवार यांचे पत्र'महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या प्रांगणात ड्युटीवर असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याला काही लोकांनी मारहाण केली. याप्रकारचं वृत्त समजलं. माझ्या मते महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात विधिमंडळाच्या प्रांगणात लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकार्‍यावर हात उचलण्याचं कृत्य यापूर्वी कधीही केलं नव्हतं. मी 27 वर्षं या विधिमंडळाचा सदस्य होतो. त्या सदनामध्ये काही घटकांकडून असं कृत्य व्हावं, याची मला लाज वाटते. हे निषेधार्ह आहे. कायद्याच्या दृष्टीनं हा एक गंभीर गुन्हा आहे. सेवेमध्ये असताना कोणत्याही अधिकार्‍यावर लोकप्रतिनिधींसह कुणीही हात उचलणं हा कायद्याच्या दृष्टीनं गंभीर गुन्हा आहे. मी राज्य सरकारला आवाहन करतो की जे कुणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कारवाई करून हे एक कायद्याचं राज्य आहे याची प्रचिती महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावी. महाराष्ट्रातल्या जनतेला हे स्पष्ट केलं पाहिजे की कायदा हातात घेणारा कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई करण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आणि त्याचवेळी माझं विधिमंडळातल्या सदस्यांना आवाहन आहे की लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा कायदा हातात घेऊन वाढणार नाही. असे करणारे जे कुणी असतील त्यापासून आपण दूर आहोत, असा संदेश त्यांनी जनतेला द्यावा.' - शरद पवार

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2013 04:11 PM IST

'आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे'

19 मार्च

आज विधानभवनाच्या प्रांगणात आमदारांनी एपीआयला केलेल्या मारहाणीच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कडक शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात विधिमंडळाच्या प्रांगणात लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकार्‍यावर हात उचलण्याचं कृत्य यापूर्वी कधीही केलं नव्हतं. मी 27 वर्षं या विधिमंडळाचा सदस्य होतो. त्या सदनामध्ये काही घटकांकडून असं कृत्य व्हावं, याची मला लाज वाटते. हे निषेधार्ह आहे अशा शब्दात शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच कायद्याच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा असून आमदारांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कारवाई करून हे एक कायद्याचं राज्य आहे याची प्रचिती महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली. शरद पवार यांनी आयबीएन लोकमतशी खास बातचीत केली यावेळी ते बोलत होते.

शरद पवार यांचे पत्र

'महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या प्रांगणात ड्युटीवर असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याला काही लोकांनी मारहाण केली. याप्रकारचं वृत्त समजलं. माझ्या मते महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात विधिमंडळाच्या प्रांगणात लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकार्‍यावर हात उचलण्याचं कृत्य यापूर्वी कधीही केलं नव्हतं. मी 27 वर्षं या विधिमंडळाचा सदस्य होतो. त्या सदनामध्ये काही घटकांकडून असं कृत्य व्हावं, याची मला लाज वाटते. हे निषेधार्ह आहे. कायद्याच्या दृष्टीनं हा एक गंभीर गुन्हा आहे. सेवेमध्ये असताना कोणत्याही अधिकार्‍यावर लोकप्रतिनिधींसह कुणीही हात उचलणं हा कायद्याच्या दृष्टीनं गंभीर गुन्हा आहे. मी राज्य सरकारला आवाहन करतो की जे कुणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कारवाई करून हे एक कायद्याचं राज्य आहे याची प्रचिती महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावी. महाराष्ट्रातल्या जनतेला हे स्पष्ट केलं पाहिजे की कायदा हातात घेणारा कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई करण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आणि त्याचवेळी माझं विधिमंडळातल्या सदस्यांना आवाहन आहे की लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा कायदा हातात घेऊन वाढणार नाही. असे करणारे जे कुणी असतील त्यापासून आपण दूर आहोत, असा संदेश त्यांनी जनतेला द्यावा.' - शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2013 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close