S M L

बसपा आमदाराकडून इंजिनिअरचा खून

24 डिसेंबर उत्तरप्रदेशउत्तरप्रदेशमध्ये पीडब्ल्यूडीच्या इंजिनिअरच्या खूनप्रकरणी सत्ताधारी बहुजन समाज पक्षाच्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंजिनिअरचं नाव मनोज गुप्ता आहे. तर बहुजन समाज पक्षाच्या आमदाराचं नाव शेखर तिवारी आहे. तिवारीला अटक केलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री मायावती यांनी दिलंय. तसंच मनोजच्या कुटुंबीयांना मायावतींनी 5 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. रात्री 4 लोकांनी घरात घुसून मनोजला मारहाण केल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. त्यानंतर मनोजला हल्लेखोरांनीच पोलीस स्टेशनसमोर टाकून दिलं. त्याला केलेल्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाला. बसपाला पक्षनिधी द्यायला नकार दिल्यामुळेच मनोजला मारण्यात आलं असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2008 03:47 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2008 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close